टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी) :
मागील दोन वर्षांपासून शेतीत होणारे सततचे नुकसान आणि डोक्यावर वाढलेला कर्जाचा डोंगर यामुळे आलेल्या नैराश्यातून शेलेवाडी (ता. मंगळवेढा) येथील एका ३० वर्षीय तरुण शेतकऱ्याने आपले जीवन संपवले. गणेश मारुती चव्हाण असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण शेलेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

नेमकी घटना काय?
मयत गणेश चव्हाण यांचे मोठे बंधू साधू मारुती चव्हाण (वय ३२, रा. शेलेवाडी) यांनी याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश यांना मागील दोन वर्षांपासून शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. शेतीच्या आणि कौटुंबिक गरजांसाठी त्यांनी फायनान्स कंपनी तसेच बचत गटाकडून कर्ज घेतले होते.

तणावातून उचलले टोकाचे पाऊल
सततची नापिकी आणि कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, या विवंचनेतून गणेश हे गेल्या काही दिवसांपासून तीव्र मानसिक तणावाखाली होते. याच तणावातून त्यांनी दिनांक २१ नोव्हेंबर रोजी रात्री १० ते २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान राहत्या घराजवळ आपले जीवन संपवले. सकाळी ही घटना कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि कुटुंबीयांनी आक्रोश केला.

पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात अ.मृ. नं. १२३/२०२६, बीएनएसएस कलम १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबर (बक्कल नं. ५७३) हे करीत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












