mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दिवाळीच्या तोंडावर मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना दिलासा! शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची दुष्काळी मदत जमा; बँकांनी थकीत कर्जापोटी पैसे कपात केल्यास कारवाईचा इशारा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 4, 2026
in मंगळवेढा
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

टीम ​मंगळवेढा टाईम्स :

खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाने दिलेल्या ओढ्यामुळे संकटात सापडलेल्या मंगळवेढा तालुक्यातील बळीराजाला दिवाळीच्या तोंडावर शासनाने मोठा आर्थिक दिलासा दिला आहे.

शासनाच्या अग्रीम आर्थिक मदतीचे वितरण मंगळवारपासून सुरू झाले असून, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट प्रत्येकी ५ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. खात्यात पैसे जमा झाल्याचे संदेश मोबाइलवर धडकताच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2026/11/VID-20261103-WA0020.mp4

​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाची तालुक्यात तातडीने अंमलबजावणी करत महसूल प्रशासनाने ६५ हजार ८९० शेतकऱ्यांचा डेटा अनुदान वितरणासाठी यशस्वीरीत्या पोर्टलवर अपलोड केला आहे. या माध्यमातून संपूर्ण तालुक्यासाठी तब्बल ३२ कोटी ९४ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहे.

​सुट्टीच्या दिवशीही महसूल यंत्रणा कामाला

शेतकऱ्यांना सणासुदीपूर्वी ही रक्कम मिळावी, यासाठी तहसीलदार मदन जाधव यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने विशेष मोहीम हाती घेतली. शासकीय सुट्टीचा विचार न करता दोन नायब तहसीलदार, सहा मंडलाधिकारी आणि ४० तलाठ्यांनी कागदपत्रांची पडताळणी, त्रुटींची पूर्तता आणि ऑनलाइन डेटा अपलोड करण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले.

​उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच लाभ

तालुक्यातील फार्मर आयडी प्रलंबित असलेल्या सुमारे ७ हजार शेतकऱ्यांचा डेटा अपलोड करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच संबंधित शेतकऱ्यांनाही नियमानुसार मदतीची रक्कम वितरित करण्यात येणार आहे.

​कर्ज खात्यात कपात नको; तहसीलदारांचा बँकांना इशारा

शासनाने दुष्काळी मदत म्हणून दिलेली ही रक्कम बँकांनी थकीत कर्ज किंवा इतर वसुलीपोटी परस्पर वर्ग करू नये, अशा स्पष्ट सूचना तहसीलदार मदन जाधव यांनी दिल्या आहेत. कोणत्याही बँकेने या रकमेतून परस्पर कपात केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

​“दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशीही अविरत काम करून ६५ हजार ८९० शेतकऱ्यांचा डेटा अपलोड केला. मंगळवारपासून ही रक्कम खात्यावर जमा होत असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी यंत्रणा तत्पर आहे.”— मदन जाधव, तहसीलदार, मंगळवेढा

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढा हादरले! ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरपंच पतीला गाठून चोपले; ६ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

November 4, 2026
महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

November 3, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विसरली सुट्टी; मंगळवेढा तहसीलमध्ये रात्रंदिवस खटपट

November 2, 2026
सूर्योदय परिवाराचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अजित शिंदे यांना प्रदान; उपस्थितांच्या अलोट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

सूर्योदय परिवाराचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अजित शिंदे यांना प्रदान; उपस्थितांच्या अलोट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

November 1, 2026
कार्यकर्त्यांनो कामाला लागा! सिध्देश्वर आवताडे विधानसभा निवडणूकीच्या मैदानात उतरणार; बबनराव आवताडे गटाने आवळली वज्रमुठ

गरजू रुग्णांना उपचार, विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार; सिध्देश्वर आवताडे परिवाराकडून वाढदिवसाचा अनोखा सामाजिक पॅटर्न

November 1, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

‘सभा मंडप नको, रस्ते, पाणी आणि शाळा द्या!’ : मंगळवेढ्यात ग्रामस्थांची बदलती मानसिकता; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी, चाऱ्याला प्राधान्य देण्याची मागणी

October 31, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

​मांजराने उघड केला चोरीचा कट! झोपेत असताना घरात शिरला चोरटा; देव्हाऱ्याखालून सोन्याचे दागिने पळविले; मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल

October 30, 2026
काय सांगताय! साडी खरेदीवर चक्क सोन्याची नथ मोफत, 10 हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट; दीपावली निमित्ताने मंगळवेढ्यातील ‘शीतल कलेक्शन’ची फुल पैसा वसूल ऑफर

महिलांनो! मंगळवेढ्यात ‘शीतल कलेक्शन’मध्ये खरेदीदारांची तुफान गर्दी; ‘माहेश्वरी साडी महोत्सव’ आणि हमखास गिफ्ट ऑफर्सचा धमाका

October 30, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

​”तू दुसरं लग्न कसं करतेस तेच बघतो!”… मंगळवेढ्यातून भरदिवसा घरातून अपहरण केलेल्या नवविवाहितेची कर्नाटकात थरारक सुटका नेमकी कशी झाली? पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

October 29, 2026
Next Post
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढा हादरले! ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरपंच पतीला गाठून चोपले; ६ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढा हादरले! ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरपंच पतीला गाठून चोपले; ६ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

November 4, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

दिवाळीच्या तोंडावर मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना दिलासा! शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची दुष्काळी मदत जमा; बँकांनी थकीत कर्जापोटी पैसे कपात केल्यास कारवाईचा इशारा

November 4, 2026
महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

November 3, 2026

निवृत्तीनंतर उघड झाली ३१ वर्षांची काळी माया! कृषी खात्यातील बड्या अधिकाऱ्याचा तो प्रताप अखेर चव्हाट्यावर…

November 3, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विसरली सुट्टी; मंगळवेढा तहसीलमध्ये रात्रंदिवस खटपट

November 2, 2026
सूर्योदय परिवाराचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अजित शिंदे यांना प्रदान; उपस्थितांच्या अलोट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

सूर्योदय परिवाराचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अजित शिंदे यांना प्रदान; उपस्थितांच्या अलोट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

November 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..