टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात सध्या दुष्काळाची भीषण तीव्रता जाणवत असून, शेतकरी व सर्वसामान्य नागरिक संकटात सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीची जाणीव ठेवून मंगळवेढा पंचायत समितीच्या

सभापती सौ. दीपाली आनंद ताड यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सामाजिक बांधिलकी जपत आपल्या एका महिन्याचे संपूर्ण मानधन दुष्काळी निधीसाठी देण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. त्यांच्या या संवेदनशील निर्णयाचे तालुक्यातून मोठे स्वागत होत आहे.

ग्रामीण भागात प्रत्यक्ष जाऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा
सध्या तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाई आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर,

आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती दीपाली ताड यांनी ग्रामीण भागात प्रत्यक्ष भेटींचा धडाका सुरू केला आहे.

वाड्या-वस्त्यांवर जाऊन ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजून घेत, जनावरांना पिण्याचे पाणी आणि चारा वेळेत मिळावा यासाठी त्या स्वतः शासन स्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आहेत.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा; मागणी मान्य
दुष्काळाची दाहकता ओळखून आमदार समाधान आवताडे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे तालुक्यासाठी तातडीने वाढीव पाणी आणि चारा उपलब्ध करून देण्याबाबत आग्रही मागणी केली होती.

या मागणीला यश आले असून पालकमंत्री गोरे यांनी वाढीव पाणी व चाऱ्याची मागणी तात्काळ मंजूर केली आहे.
शासनाच्या या सकारात्मक निर्णयामुळे मंगळवेढा तालुक्यातील सर्व भागांत चारा छावण्या, चारा डेपो आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला असून संपूर्ण तालुक्याला मोठा दिलासा मिळणार आहे.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासन दुष्काळ निवारणासाठी युद्धपातळीवर सक्रिय झाल्याने बळीराजाला मोठा आधार मिळाला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












