टीम मंगळवेढा टाईम्स ।
विधानपरिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आपले अधिकृत उमेदवार जाहीर करत प्रचारात आघाडी घेतली आहे.

याच पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या नियोजनासाठी मंगळवेढा तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक उद्या, बुधवार दि. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी २:०० वाजता एमआयडीसी परिसरातील हॉटेल स्वाद येथे आयोजित करण्यात आली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडणार आहे.

या बैठकीस जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, मंगळवेढा तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर रणे तसेच शहराध्यक्ष सचिन नागणे, युवक तालुका अध्यक्ष संग्राम माने यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार मोहिमेची रूपरेषा आखणे, मतदार नोंदणी व प्रत्यक्ष जनसंपर्क मोहिमेचा आढावा घेणे या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

आगामी निवडणुकीत पक्षाचा विजय निश्चित करण्यासाठी तालुक्यातील सर्व सेलचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व सहकाऱ्यांनी वेळेवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










