टीम मंगळवेढा टाईम्स । निसर्ग या चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. या नुकसानाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज आणि उद्या कोकण दौऱ्यावर आहेत. काजू, फोफळी, आंबा, आणि नारळाच्या बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे या भागातील नुकसानग्रस्तांकडून मदतीची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर येथील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर जाणार आहेत
दिनांक ९ जून रोजी सकाळी ८.३० वाजता मुंबईतून गाडीने प्रयाण करणार आहेत.
सकाळी ११. ३० वाजता माणगाव, १२.३० वाजता म्हसळा, १ वाजता दिवेआगार, २ वाजता श्रीवर्धन, ४ वाजता श्रीवर्धन येथे आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासमवेत बैठक, सायंकाळी ५ वाजता हरिहरेश्वर आणि नंतर ६ वाजता बागमांडला मार्गे दापोलीकडे रवाना होणार आहेत.
दापोली येथे मुक्काम करणार आहेत.दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे व स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत. दिनांक १० जून रोजी रत्नागिरी जिल्हा दौरा असून सुरुवातीला दापोली येथील नुकसानीची पाहणी करणार आहेत.
दरम्यान, हा दौरा आटोपताच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन कश्याप्रकारे मदत करता येईल यावर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5 जून रोजी कोकणच्या नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे मुंबईला परत येताच त्यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती.
Sharad Pawar on Konkan tour from today ncp
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज