टीम मंगळवेढा टाईम्स । धर्मगाव
शैक्षणिक गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाचा ठसा उमटवणाऱ्या कै. बाबुराव जाधव विद्यालय, धर्मगाव या शाळेला बहुजन साहित्य संघाचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘आदर्श शाळा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

बहुजन साहित्य संघाच्या ७ व्या राज्यस्तरीय संमेलनात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाला हा गौरवशाली पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

विद्यालयाने शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन ही निवड करण्यात आली.

या दिमाखदार सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष डॉ. एम. आर. टकले सर, संस्थेच्या सचिवा सौ. सुरेखा टकले, मार्गदर्शक बंडगर गुरुजी,

विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एम. इंगवले सर आणि उत्तम टकले यांनी व्यासपीठावर उपस्थित राहून हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.

कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक तसेच बहुजन साहित्य संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासोबतच संस्कार आणि मूल्यांची शिकवण देणाऱ्या कै. बाबुराव जाधव विद्यालयाच्या या दैदीप्यमान यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













