मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्यभरातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यभरात एकूण १,०१५ सेविका आणि ३,९२८ मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक भरती होणार आहे.
महिला व बालविकास विभागामार्फत जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये १७६ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये ६१ अंगणवाडी सेविका आणि ११५ मदतनीस पदांचा समावेश आहे.

इच्छुक महिला उमेदवारांकडून २० ते ३१ जुलै या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तसेच, २७ ऑगस्ट रोजी अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत.

या भरतीमध्ये निवड झालेल्या अंगणवाडी सेविकांना दरमहा १३ हजार रुपये, तर मदतनीसांना ७ हजार ५०० रुपये मानधन दिले जाणार आहे.शासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ३ ते ७ ऑगस्ट दरम्यान अर्जांची छाननी करून प्राथमिक गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

१० ते १२ ऑगस्ट या कालावधीत पडताळणी समितीकडून गुणवत्ता यादीची तपासणी केली जाईल. त्यानंतर १३ ते २६ ऑगस्ट या कालावधीत हरकती आणि आक्षेप नोंदविता येतील.

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २७ ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे पाठवण्यात येतील.

अंगणवाडी सेविकांवर बालकांचे पूर्वप्राथमिक शिक्षण, गरोदर महिलांच्या आरोग्याची नोंद, पोषण आहार वितरण, बालकांच्या आरोग्याची देखरेख, पोषण ट्रॅकरवर माहिती नोंदविणे आणि शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असते.

तर मदतनीस बालकांच्या शिक्षणात सहाय्य करणे, अंगणवाडीचे दैनंदिन कामकाज, वजन व उंचीच्या नोंदी ठेवणे आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीत सेविकांना मदत करणे हे काम असेल.
सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट, बार्शी, वैराग, करमाळा, माढा, टेंभुर्णी, माळशिरस, अकलूज, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, पंढरपूर, सांगोला, कोळा आणि दक्षिण सोलापूर या प्रकल्पांमध्ये भरती होणार आहे. त्यामुळे सरकारी सेवेत काम करण्याची इच्छा असलेल्या पात्र महिलांसाठी ही भरती मोठी संधी आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













