मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडी येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवेढा पोलिसांनी शुक्रवारी (३ जुलै) दुपारी अचानक धाड टाकत एक मोठी आणि धडक कारवाई केली. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिसांनी कारवाईदरम्यान ७ जुगाऱ्यांना रंगेहात ताब्यात घेतले असून, एक जण पोलिसांची गाडी पाहताच घटनास्थळावरून फरार झाला.

या धडक कारवाईत पोलिसांनी १ लाख ४८ हजार २५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन आणि जुगाराच्या साहित्याचा समावेश आहे.

पोलिसांनी आवळल्या मुसक्या; ‘हे’ आहेत ताब्यात घेतलेले आरोपी, जुगार खेळत असताना रंगेहात पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे

१. दादा भगरे (रा.नागणेवाडी), २. प्रदीप पडवळे (रा. जगदाळे गल्ली), ३. भरत साळुंखे (रा. पंढरपूर), ४. सुनिल कुचे (रा. झेंडे गल्ली), ५. विशाल जाधव (रा.उमदी), ६. नवनाथ लोहार (रा. जाडरबोबलाद), ७. वाहिद मुलाणी (रा. मंगळवेढा)

फरार आणि जागा मालकावरही गुन्हा दाखल
पोलिस आल्याची चाहूल लागताच अमर जाधव (रा. आंधळगाव) हा आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. तसेच जुगाराच्या अड्ड्यासाठी जागा उपलब्ध करून देणारा जागामालक अमोल मुगदुल (रा. शनिवार पेठ) याच्यासह सर्व आरोपींविरुद्ध मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास सुरू:
या प्रकरणाचा अधिक तपास मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार हे करीत आहेत. फरार आरोपीचा शोध पोलीस घेत असून, तालुक्यातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी उघडलेल्या या मोहिमेचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










