mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तरुणपणी गोळी झाडली, म्हातारपणी शिक्षा झाली, 85 वर्षीय वृद्धाला 34 वर्षांनी कारावासाची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 5, 2026
in राष्ट्रीय
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग। 

“कायद्याचे हात लांब असतात” याचा प्रत्यय देणारा निर्णय बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील न्यायालयाने दिला आहे. तब्बल ३४ वर्षे जुन्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात न्यायालयाने ८५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवत तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

बिहारमधी वैशाली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज कुमार तिवारी यांच्या न्यायालयाने या जुन्या प्रकरणाचा निकाल दिला. न्यायालयाने १ जून रोजी सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर २ जून रोजी आरोपी दीप राय उर्फ जीसा राय याला शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत (आर्म्स अॅक्ट) दोषी ठरवत तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

बिहारमधील वैशाली जिल्हा न्यायालयाने मंगळवारी २ जून रोजी एका ऐतिहासिक निकालात तब्बल ३४ वर्षे जुन्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात एका ८५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवत तुरुंगात पाठवले.

वैशालीचे अप्पर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मनोज कुमार तिवारी यांच्या न्यायालयाने १ जून रोजी या खटल्याची सुनावणी पूर्ण केली होती आणि २ जून रोजी या अत्यंत जुन्या प्रकरणात आपला निकाल सुनावला. न्यायालयाने आरोपी वृद्ध दीप राय याला आर्म्स ॲक्टच्या गंभीर कलमांखाली दोषी ठरवले असून तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

नेमकं काय आहे प्रकरण?

हे प्रकरण १९९२ सालातील आहे. परस्पर वादातून एका दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला आणि गोळीबार केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीदरम्यान या नऊ आरोपींपैकी चौघांचा मृत्यू झाला, तर पाच आरोपी अद्याप जिवंत आहेत. त्यामध्ये दीप राय याचाही समावेश आहे.

पोलीस नोंदी आणि न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, १० मे १९९२ रोजी पीडित कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, पीडित व्यक्ती आपल्या पत्नीसोबत घराच्या दारात बसलेली असताना आरोपींनी धारदार शस्त्रांसह त्यांच्यावर हल्ला केला.

तसेच दहशत निर्माण करण्याच्या आणि जीव घेण्याच्या उद्देशाने गोळीबारही करण्यात आला होता. या हल्ल्यात दाम्पत्याचा जीव थोडक्यात बचावला होता, मात्र दोघेही गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि १९९३ मध्ये या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले.

३४ वर्षांनंतर आता लागला निकाल

या प्रकरणातील सुनावणी अनेक वर्षे सुरू राहिली. अखेर ३४ वर्षांनंतर न्यायालयाने या खटल्याचा निकाल देत दीप राय याला दोषी ठरवले. न्यायालयाच्या निर्णयामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या निकालामुळे कितीही वर्षे लोटली तरी गुन्ह्याचा पाठपुरावा थांबत नाही आणि न्याय मिळण्यास विलंब झाला तरी तो नाकारला जात नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोर्टाचा निकाल

संबंधित बातम्या

प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर

May 29, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

नागरिकांनो! पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जनतेला आवाहनं, कारण काय?

May 11, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

पश्चिम बंगालमध्ये सत्ता येताच पीएम मोदींचा मास्टर स्ट्रोक; ‘या’, योजनेला दिली मंजूरी, नागरिकांना होणार मोठा फायदा

May 5, 2026
नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

बजेट कोलमडणार! पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्याचे संकेत; नव्या दरांची ‘इतक्या’ दिवसांत होणार घोषणा

May 3, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

कामाची बातमी! मोदी सरकारचा 10 हजार रुपये पेन्शन देण्याचा विचार; ‘या’ लोकांना होणार मोठा फायदा

April 24, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनो! गॅस सिलिंडरसाठी आता नवा नियम, हा नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; वाचा काय गरजेचं?

April 22, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

मोठी बातमी! बारामतीत अपघात, बंगळुरूत तक्रार; अजित पवार अपघात प्रकरणी दाखल झालेली झिरो FIR नेमकी आहे तरी काय?

March 27, 2026
Next Post
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

शेतकऱ्यांनो! आधी 'ही' रक्कम बँकेत भरावी लागणार; मगच मिळणार कर्जमाफी व नवीन पीककर्ज

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

आता खेळ खल्लास! भेसळखोरांविरोधात तुकाराम मुंढे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

June 5, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

शेतकऱ्यांनो! आधी ‘ही’ रक्कम बँकेत भरावी लागणार; मगच मिळणार कर्जमाफी व नवीन पीककर्ज

June 5, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

तरुणपणी गोळी झाडली, म्हातारपणी शिक्षा झाली, 85 वर्षीय वृद्धाला 34 वर्षांनी कारावासाची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

June 5, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

धक्कादायक! स्त्री रोगतज्ञ डॉक्टर लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात; 4500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं

June 4, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

समृद्ध पंचायतराज अभियानात मंगळवेढ्यातील ‘या’ गावची छाप; जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीकडून विकासकामांची पाहणी

June 5, 2026
खुशखबर! श्रीराम सुपर मार्ट आजपासून मंगळवेढ्यातील ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज; सर्व खरेदी आता एकाच छताखाली; खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू

पालकांसाठी आनंदाची बातमी! मंगळवेढ्यातील ‘श्रीराम सुपर मार्ट’मध्ये शालेय साहित्यावर २५% ते ६०% पर्यंत घसघशीत सूट; महागाईला ब्रेक, नव्या शैक्षणिक वर्षाची खरेदी होणार आता बजेटमध्ये

June 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा