mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 28, 2026
in मंगळवेढा, राजकारण, राज्य, सोलापूर
राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

टीम ​मंगळवेढा टाईम्स (विशेष प्रतिनिधी)

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यात भाजपच्या पक्षवाढीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच, पंढरपूर-मंगळवेढा स्थानिक राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

नगरपालिका निवडणुकीत भाजपला पराभूत करत पंढरपूर-मंगळवेढ्यात सत्ता काबीज करणाऱ्या ‘तीर्थक्षेत्र विकास आघाडीत’ आता अधिकृतपणे मोठी फाटाफूट झाली आहे.

​गत महिन्यात भगीरथ भालके यांनी पंढरपूरच्या नगराध्यक्ष प्रणिता भालके व इतर नगरसेवकांसह शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला.

या घडामोडीनंतर आता मंगळवेढ्याचे नेते आणि डीसीसी बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे हे आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी मंगळवेढ्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड जोर धरला आहे.

​…आणि ‘तीर्थक्षेत्र विकास आघाडी’त खटके उडाले!

​मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीत भगीरथ भालके आणि बबनराव आवताडे यांनी एकत्र येत ‘तीर्थक्षेत्र विकास आघाडी’च्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत आघाडीने नगराध्यक्षपदासह ९ जागांवर विजय मिळवून सत्ता स्थापन केली होती.

मात्र, त्यानंतर स्वीकृत नगरसेवक निवडीवरून आघाडीत अंतर्गत खटके उडाले. वाद इतका टोकाला गेला की पक्षनेते बदलण्यापर्यंतची कारवाई झाली आणि येथूनच आघाडीत फूट पडायला सुरुवात झाली.

​मुंबईत ‘त्या’ गुप्त भेटीमुळे चर्चेला उधाण

​काही दिवसांपूर्वी बबनराव आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीदरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे, मंगळवेढा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे आणि भाजपचे राजेंद्र सुरवसे उपस्थित होते.

विशेष म्हणजे, सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य इच्छुक उमेदवार जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण हे देखील या भेटीत सोबत असल्याने आवताडे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिक बळकटी मिळाली आहे.

​मुख्यमंत्र्यांकडे मंगळवेढ्याच्या प्रलंबित प्रश्नांचा पाढा

​या महत्त्वाच्या भेटीदरम्यान बबनराव आवताडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मंगळवेढ्यातील प्रलंबित विकासकामांचे निवेदन दिले. यामध्ये प्रामुख्याने मंगळवेढा ​शहरातील भूमिगत गटार योजना पूर्ण करणे. ​शहरासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे. ​नगरपालिकेला पूर्णवेळ मुख्य अधिकारी नेमणे. ​महात्मा बसवेश्वर स्मारक आणि संत चोखोबा स्मारक यांचा प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवणे.

​विधान परिषद निवडणुकीत भाजपला मोठा फायदा?

​जर बबनराव आवताडे, सिद्धेश्वर आवताडे, नगराध्यक्षा सुनंदा आवताडे आणि त्यांचे समर्थक नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले, तर आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपला याचा मोठा राजकीय फायदा होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. या संभाव्य पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील संपूर्ण राजकीय समीकरणे बदलणार हे मात्र नक्की!

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बबनराव आवताडे

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध; महाराष्ट्र सरकार लावणार शिस्त; दिवसाला ५ तासांची मर्यादा; ‘इतक्या’ वर्षांखालील मुलांना प्रवेश मनाई, शुल्कवाढीलाही लगाम

August 26, 2026
Next Post
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या 'सिंगम' स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, 'एवढे' भेसळखोर गजाआड

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..