टीम मंगळवेढा टाइम्स । दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे निंबर्गी रोडवर चोरट्यांनी कोरोना काळात तोंडावर मास्क बांधून नऊ दुकाने फोडली. या दुकानांमधून ७२ हजारांची रोकड पळविली आहे. (Solapur Nine shops were blown up in Mandrup with masks on their faces)
शुक्रवारी पहाटे एक ते अडीच वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रकार घडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासकामाची चक्रे वेगाने फिरवली ; मात्र त्यांचा मागमोस लागू शकलेला नाही.
मंद्रुप बाजारपेठेतून निंबर्गीला रोड जातो. या रस्त्याच्या कडेला ओळीने खत, सिमेंट , किराणा, मोबाईल विक्रीची दुकाने आहेत.
यातील पाच दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवली गेली आहेत. चोरट्यांनी तोंडाला मास्क बांधून ही दुकाने फोडल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. चोरट्यांनी रविकुमार कालदे यांचे किराणा दुकान , सोमशेखर बिराजदार यांचे कृषी केंद्र , गजानन कृषी केंद्र , प्रियंका कृषी केंद्र , जय अंबे मोबाईल शॉपी , गणेश दूध केंद्र , बसवेश्वर भुसार व पशुखाद्य दुकान , धरेप्पा अडोळे यांचे स्पेअर पार्ट दुकान आणि एक पंक्चर दुकान फोडले , कोरोनानंतर आता चोरट्यांनी दुकानदारांना आर्थिक संकटात ढकलले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज