टीम मंगळवेढा टाइम्स।
भगीरथ भालके यांनी शिवसेनेत प्रवेश करताच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या ‘अरे-तुरे’च्या भाषेतील टीकेला आता गोरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
भगीरथ यांनी मला बोलायला भाग पाडू नये; ते मला कधी आणि कशासाठी भेटले होते, हे मी जाहीर करू का?” असा सूचक इशारा देत गोरेंनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

नेमका वाद काय?
दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर बोचरी टीका केली होती.
नगरपालिका निवडणुकीवेळी पालकमंत्री आम्हाला हिणवत होते की, निवडून आल्यावर निधीसाठी माझ्याकडेच यावे लागेल. पण आता सांगतो, निधी देणारा माणूस (एकनाथ शिंदे) येथे बसला आहे, अशा शब्दांत भालके यांनी गोरेंना टार्गेट केले होते.

जयकुमार गोरेंचे प्रत्युत्तर: ‘नानांना हे अपेक्षित नव्हते‘
या टीकेबाबत पत्रकारांनी विचारले असता जयकुमार गोरे यांनी भालके यांच्या भाषेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “अरे-तुरेची भाषा वापरून भगीरथ यांनी आपली संस्कृती दाखवून दिली आहे. अशा प्रकारची वागणूक दिवंगत भारत नानांना कधीच अपेक्षित नव्हती.

“माझे आणि भारत नानांचे संबंध काय होते, हे कदाचित भगीरथ यांना माहित नसावे. माझ्या मतदारसंघाचा संबंध नसतानाही, पाणी प्रश्नासाठी जेव्हा नाना महिनाभर मुंबईत होते, तेव्हा मी त्यांना सर्वतोपरी मदत केली होती.

भगीरथ यांनी मला बोलायला भाग पाडू नये. ते मला कधी भेटले? कशासाठी भेटले? हे मी सांगू का? निवडणुकीच्या व्यासपीठावर आरोप-प्रत्यारोप होत असतात, पण त्यांनी वैयक्तिक पातळीवर घसरू नये.
आता त्यांना माझ्या निधीची गरज पडणार नाही, कारण त्यांना निधी देणारी मोठी माणसे भेटली आहेत,” असा टोलाही गोरेंनी यावेळी लगावला.

राजकीय धग वाढणार
भगीरथ भालके यांच्या सत्ताधारी पक्षातील प्रवेशानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील समीकरणे बदलू लागली आहेत. मात्र, पालकमंत्री आणि भालके यांच्यातील हा ‘कलगीतुरा’ येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या राजकारणात नवे वळण घेण्याची शक्यता आहे.
ज्यांनी मदतीचा हात दिला त्यांच्यावरच टीका करणे ही भालकेंची पद्धत नानांच्या विचारांशी सुसंगत नाही,” अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













