टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढ्यातील तमाम भाविक आणि नागरिकांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा आता संपणार आहे. महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी अखेर जागा निश्चित करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. वीरशैव मंगल कार्यालय येथे आयोजित भव्य ‘संकल्प मेळाव्यात’ ते बोलत होते.
स्मारकासाठी जागेचा प्रश्न सुटला असून आता कामाला वेग येणार. हे केवळ स्मारक नसून त्यात अनुभव मंडप, ध्यानमंडप, ग्रंथालय, रिसर्च सेंटर आणि म्युझिकल लेझर शो यांसारख्या आधुनिक सुविधा असतील.
बसवेश्वर स्मारकासोबतच संत चोखामेळा स्मारक आणि ‘संतसृष्टी’साठी देखील जुनी पोलीस वसाहत व न्यायालय परिसरातील जागा निश्चित करण्यात आली आहे.

आमदार समाधान आवताडे काय म्हणाले?
”मंगळवेढा ही संतांची भूमी आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की या पवित्र भूमीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली. आमदारकीची शपथ घेतल्यापासून मी सातत्याने या स्मारकांसाठी पाठपुरावा केला आहे. आता स्मारकाची स्वप्नपूर्ती लवकरच होईल आणि त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.”

अपेक्षित सोयी-सुविधा:
विजय बुरकुल यांनी मांडलेल्या सूचनेनुसार, या स्मारकात केवळ पुतळा नसून खालील गोष्टींचा समावेश असावा अशी मागणी आहे:
प्रशस्त हॉल आणि एम्फी थिएटर
५० बेडचे सुसज्ज रुग्णालय
बस स्टॉप, पोलीस स्टेशन आणि अग्निशमन दल
प्रमुख उपस्थितांची मांदियाळी
यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माजी नगराध्यक्षा अरुणा माळी, ॲड.शिवानंद पाटील, मल्लप्पा स्वामी, सतीश दत्तू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मेळाव्याचे प्रास्ताविक विनायक कलुबर्मे यांनी केले, तर सूत्रसंचालन संतोष मोगले यांनी मानले.
मंगळवेढ्याच्या वैभवात भर घालणाऱ्या या प्रकल्पासाठी सर्व बसवेश्वर प्रेमींनी यावेळी सामूहिक शपथ घेऊन स्मारकाच्या पूर्ततेसाठी निर्धार व्यक्त केला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












