mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 8, 2026
in मंगळवेढा
​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

मंगळवेढा टाईम्स न्युज। 

मंगळवेढा शहरात येत्या दि. १ एप्रिल २०२६ रोजी साप्ताहिक रणयुग टाईम्सचा १४ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. पत्रकारिता, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, सहकार, कृषी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक संपादक प्रमोद दिलीप बिनवडे यांनी दिली.

हा भव्य वर्धापन दिन सोहळा दि. ०१ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता मंगळवेढा येथील मैत्री लॉन्स, खोमनाळ रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंढरपूर–मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान (दादा) आवताडे यांच्या हस्ते होणार असून

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक केंद्रीय अध्यक्ष राजा माने हे विराजमान राहणार आहेत.

तसेच विविध नामांकित वृत्तपत्रांचे संपादक मान्यवर या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.यामध्ये दै. दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे,दै.सांगोला नगरीचे संपादक सतीश सावंत, दै.राष्ट्रसंचार (पुणे)चे संपादक अनिरुद्ध बडवे आणि पंतनगरी वृत्त समूहचे संपादक रजाक मुजावर यांचा समावेश आहे.

पुरस्कार प्राप्त मान्यवर:-

अंकुश म्हेत्रे -जीवनगौरव,सुनंदा (आबी) आवताडे- कर्तुत्ववान नारीरत्न,अमोलराजे भोसले- सेवारत्न, नंदकुमार बेडसे-शिक्षण सेवारत्न,श्रीकृष्ण गुरूकुल शिक्षणसंस्था-विद्याभूषण संस्थारत्न,डॉ.बाळासाहेब सरवळे- कृषीरत्न,भारत सोनवणे-लोकसेवारत्न, पुतळाबाई उगाडे-आदर्श मातारत्न,सुवर्णा साळुंखे-डोके-शिक्षकरत्न,प्रविण खवतोडे- युवा संघटनरत्न,

चंद्रकांत पडवळे-कार्यरत्न,योगेश खटकाळे- युवा राजरत्न,डॉ.नितीन चौंडे-आरोग्यरत्न, योगेश तुरेराव-दर्पणरत्न,संतोष मोगले-विमा सेवारत्न, धनश्री डोके- युवा उद्योजिकारत्न,विद्यागौरी अवघडे- युवती राजरत्न,लखन माने- युवा कृषीरत्न,

श्रीनिवास तिर्थे-सहकार दीपरत्न,संतोष पवार-युवा उद्योगरत्न, नुतन मराठी विद्यालय-आदर्श शाळारत्न आणि त्रिशालादी पतसंस्था – संस्थारत्न इ. पुरस्कार जाहीर करण्यात आला आहेत.

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत गेल्या १४ वर्षांपासून साप्ताहिक रणयुग टाईम्स सातत्याने कार्यरत आहे. या वर्धापन दिन सोहळ्यास पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक संपादक प्रमोद दिलीप बिनवडे यांनी केले आहे.

हे सर्व पुरस्कार साप्ताहिक रणयुग टाईम्सच्या १४ व्या वर्धापन दिन सोहळ्यात दि. १ एप्रिल रोजी सायं. ५ वाजता मंगळवेढा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहेत. समाजाच्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश असल्याचे संपादक प्रमोद बिनवडे यांनी सांगितले.

सत्काराला मान्यवरांनी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ यांसारख्या वस्तू न आणता त्याऐवजी शालेय साहित्य आणावे

या वर्धापन दिन सोहळ्याचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक सत्कार पद्धतीऐवजी सामाजिक बांधिलकी जपत एक अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.

कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांनी हार, तुरे, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ यांसारख्या वस्तू न आणता त्याऐवजी शालेय साहित्य उदाहरणार्थ -वही, पेन, पेन्सिल, कंपास, शालेय बॅग आदी वस्तू भेट स्वरूपात स्विकारल्या जातील असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमात संकलित होणारे हे शैक्षणिक साहित्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे. समाज हिताचा संदेश देणारा हा उपक्रम ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: साप्ताहिक रणयुग टाईम्स

संबंधित बातम्या

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 27, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
Next Post
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

ताज्या बातम्या

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

‘एकतर मी जाईन, नाहीतर सरकार…’; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, ‘या’ तारखेला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

July 31, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा