टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात आज मंगळवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार 112 अहवाल प्राप्त असून त्यापैकी 94 अहवाल निगेटिव्ह आहेत तर 18 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये 11 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश आहे.
18 patients affected by corona in Solapur; Four died, bringing the total number to 1672
आजपर्यंत सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या 1672 इतकी आहे. एकूण मृतांची संख्या 143 पर्यंत पोहोचली आहे तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 657आहे. रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेली व्यक्तींची संख्या 872 इतकी आहे.
आज एकाच दिवशी बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तीची संख्या 47 इतकी आहे. यामध्ये 25 पुरुष आणि 22 महिलांचा समावेश आहे.
आज चौघा जणांचा मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अमृत नगर विजापूर रोड परिसरातील 85 वर्षाचे पुरूष, मुरारजी पेठ परिसरातील 29 वर्षीय युवक, भवानी पेठ परिसरातील 56 वर्षीय पुरूष तर अशोक चौक न्यू पाच्छा पेठ येथील 46 वर्षीय पुरूषाचा मृत्यु झाल्याची नोंद घेण्यात आल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.
आज या परिसरातील बाधित रुग्ण आढळून आले.
गांधीनगर, अक्कलकोट रोड 1 पुरूष
संगमेश्वर नगर 1 पुरूष 2 महिला
हनुमाननगर, भवानी पेठ 1 पुरूष
बुधवार पेठ 1 पुरूष
जय मल्हार चौक, बुधवार पेठ 1 महिला 1 पुरूष
गव्हरमेंट क्वॉर्टस, कुमठा नाका 1 महिला
पेंटर चौक, शनिवार पेठ 1 महिला
गणेश मंदिर, इंदिरा नगर, विजापूर रोड 1 महिला
विडि घरकुल, हैद्राबाद रोड 1 पुरूष
न्यू पाच्छा पेठ 1 पुरूष
जय संतोषी माता नगर, शेळगी 1 पुरूष
मिलिंद नगर, बुधवार पेठ 1 पुरूष
दत्त नगर 1 पुरूष
2 नं. झोपडपट्टी बुध्द विहारजवळ विजापूर रोड 1 महिला
दक्षिण सदर बझार, गांधी नगर 1 पुरूष
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज