mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 25, 2026
in मंगळवेढा
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स।

मंगळवेढा तालुक्यातील घरकुल लाभार्थी यांना शासन नियमानुसार देय असलेल्या मोफत वाळू वाटपाच्या कार्यक्रमास मंगळवार दि. 24 पासून सुरुवात करण्यात आली आहे.

पहिल्याच दिवशी 31 लाभार्थ्यांना पंचायत समिती सदस्या जयश्री कवचाळे व प्रांताधिकारी बी.आर.माळी यांच्या हस्ते ई चलन व गुलाब पुष्प देऊन लाभार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व त्यांना वाळूचे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी तहसीलदार मदन जाधव, गट विकास अधिकारी डॉ.जसमीन शेख, नोडल अधिकारी श्रीनिवास शेरला, मंडळ अधिकारी महेश पवार, ग्राम महसूल अधिकारी सचिन वाघमारे, ग्राम पंचायत अधिकारी संगीता माने व इतर नागरिक उपस्थित होते.

मंगळवेढा तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत एकूण 9219 घरकुल लाभार्थी असून सद्यस्थितीत पात्र लाभार्थी 8579 आहेत. त्यातील बांधकाम चालू असलेल्या घरकुलाची स्थिती पाहून त्यांना आवश्यक वाळू मोफत देण्यात येणार आहे.

घरकुल लाभार्थ्यांना आपल्या घराच्या बांधकामासाठी मोफत वाळू मिळावी या उद्देशाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिनांक 31/12/2025 रोजी परिपत्रक काढून घरकुल साठी वाळू वाटपाची कार्यपद्धती निश्चित केली आहे.

त्यानुसार घरकुल बांधकामाचे टप्पे निश्चित करून त्या त्या टप्प्याला बांधकाम आले की वाळू वाटप केले जाणार आहे. ही प्रक्रिया प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी राबवली जाणार असल्याने आता घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या निर्देशानुसार पंचायत समिती मार्फत प्रथम पात्र घरकुल लाभार्थ्यांची यादी तयार केली जाईल. त्यानंतर घरकुलाचा पाया खोदताना 2 ब्रास व पुढील बांधकामास 3 ब्रास याप्रमाणे मोफत वाळू दिली जाणार आहे.

पात्र लाभार्थ्यांची माहिती महाखनिज प्रणालीवर अपलोड करून लाभार्थ्यांची आधार कार्डच्या माध्यमातून पडताळणी करून त्यांना ई चलन काढून वाहतूक पास देण्यात येणार आहे.

ज्या लाभार्थ्यांना ई चलन देण्यात येईल त्या लाभार्थ्यांना दर मंगळवारी व शुक्रवारी त्यांच्या जवळच्या वाळू गटातून मोफत वाळू दिली जाणार आहे. संपूर्ण प्रक्रियेसाठी नोडल अधिकारी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्रीनिवास शेरला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पहिल्याच दिवशी 31 लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 ब्रास वाळूचे वाटप तांडोर येथील वाळू गटातून करण्यात आले.

पंचायत समिती मार्फत प्रत्येक आठवड्याला पात्र लाभार्थी यांना ई चलन तयार करून मोफत वाळू दिली जाणार आहे, याचा लाभ तालुक्यातील घरकुल लाभार्थी यांनी घ्यावा असे आवाहन तहसीलदार मदन जाधव व गटविकास अधिकारी जसमीन शेख यांनी केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: घरकुल मोफत वाळू

संबंधित बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

सोलापूर विधानपरिषद निवडणूक: उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम; कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली; मुंबईत लॉबिंग सुरू; परीचारकांचे नाव आघाडीवर पण…

May 26, 2026
मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या ‘या’ नावांची जोरदार चर्चा

मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या ‘या’ नावांची जोरदार चर्चा

May 26, 2026
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

राजकीय घडामोडींना वेग! मंगळवेढ्यात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाची आज मोठी बैठक; ३७ सेलच्या निवडींबाबत होणार खलबतं; आजी-माजींसह इच्छुकांना बोलावले

May 24, 2026

मंगळवेढ्यात खळबळ! शासकीय कामात अडथळा; शेत रस्त्याच्या कामावरून मंडळ अधिकारी व तलाठ्याला दमदाटी, गुन्हा दाखल

May 24, 2026
🛑मंगळवेढ्यात पिस्तुल घेऊन आले आणि थेट पोलिसांच्याच जाळ्यात अडकले; कोठून आणले पिस्तुल? कोणाचा गेम करणार होते? मंगळवेढ्यातील ‘त्या’ दोघांच्या अटकेने मोठी खळबळ

🛑मंगळवेढ्यात पिस्तुल घेऊन आले आणि थेट पोलिसांच्याच जाळ्यात अडकले; कोठून आणले पिस्तुल? कोणाचा गेम करणार होते? मंगळवेढ्यातील ‘त्या’ दोघांच्या अटकेने मोठी खळबळ

May 24, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! मंगळवेढ्यात ‘नीट’ पेपर फुटीचे लोन? निकाल लागण्यापूर्वीच बॅनरबाजी करणारे ‘ते’ कोचिंग क्लासेस CBI च्या रडारवर?

May 22, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड 'या' तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

ताज्या बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

May 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..