मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
शाळेत गेल्यानंतर प्रकृती बिघडली, म्हणून रजा घेऊन घराकडे निघालेल्या एका शिक्षकावर काळाने घाला घातला. कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अहमदपूर-अंबाजोगाई महामार्गावरील काजळी हिप्परगा पाटीजवळ कार पुलाच्या कठड्याला धडकून लागलेल्या भीषण आगीत जिल्हा परिषद शिक्षक माधव बाबुराव श्रीवाड यांचा होरपळून मृत्यू झाला.

या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात आणि कोळवाडी परिसरात मोठी शोककळा पसरली.
इंजिनमधून आवाज अन् होत्याचं नव्हतं झालं!
गुरुवारी सकाळी ९ वाजता माधव श्रीवाड नेहमीप्रमाणे कोपदेव हिप्परगा येथील जिल्हा परिषद शाळेत हजर झाले होते.

मात्र, काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी घरची वाट धरली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काजळी पाटीजवळ त्यांच्या मारुती ८०० कारच्या इंजिनचा मोठा आवाज येत होता. काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येण्यापूर्वीच कार वेगाने पुलाच्या कठड्यावर आदळली.

बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही
कठड्याला धडक बसताच कारने क्षणात पेट घेतला. आग इतकी भीषण होती की माधव श्रीवाड यांना गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि माधव श्रीवाड यांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गाडीचंही मोठं नुकसान झालं होतं.

एक हसते-खेळते कुटुंब उध्वस्त
मृत माधव श्रीवाड यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती.
आजारपणामुळे घरी परतणे त्यांच्यासाठी शेवटचा प्रवास ठरेल, अशी पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. काळाने अखेर झडप घातली आणि चांगला शिक्षक हिरावून नेला. कुटुंबियांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











