मंगळवेढा टाईम्स टीम । लॉकडाऊननंतर महागाई आपल्याला पूर्वीपेक्षा जास्त त्रास देईल, याचे संकेत मिळू लागले आहेत. लॉकडाऊन सुरु होण्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट Decline in international crude oil prices झाली असली तरी आज १२ व्या दिवशीही ऑईल मार्केटींग कंपनीने (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) भाव वाढविले आहेत. Petrol-diesel price hike for 12th consecutive day
पेट्रोलच्या दरात ०.५३ रुपयांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या किंमती ०.६४ रुपयांनी वाढल्या आहेत. बुधवारी पेट्रोलचा दर वाढून ७७.८१ रुपये झाला. तर डिझेल दरही वाढविण्यात आला आहे. डिझेलची किंमत ७६.४३ रुपये प्रतिलिटर झाली.
महानगरांमध्ये इंधन दर
मुंबईत पेट्रोल आता प्रतिलिटर ८४.६८ रुपये तर डिझेल ७४.३३ रुपये प्रतिलिटर झाले आहे. त्याचबरोबर चेन्नईतील लोकांना एक लिटर पेट्रोलसाठी ८१.३९आणि डिझेलसाठी ७४.३३ रुपये मोजावे लागतील. तर कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत ७९.६१ आणि डिझेलची किंमत७१.९७ रुपयांवर पोहोचली आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण
दुसरीकडे, कमी मागणीमुळे व्यापाऱ्यांनी आपली मागणीही कमी केली आहे. बुधवारी वायदा बाजारात कच्चा तेलाची किंमत १.१९ टक्क्यांनी घसरून २८९५ रुपये प्रति बॅरल झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये कच्चे तेलाची डिलिव्हरीची किंमत ३५ रुपयांनी किंवा ११.१९ टक्क्यांनी घसरून २८५९ रुपये प्रति बॅरल झाली.
Petrol-diesel price hike for 12th consecutive day
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज