मंगळवेढा टाईम्स न्युज।
शेतामध्ये जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या आजी व तीन वर्षीय नातवावर तरस या वन्यप्राण्याने हल्ला करून जखमी केले. सुदैवाने या घटनेत आजी व नातू बालंबाल बचावले.
ही घटना चिकमहूद (ता. सांगोला) येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास जखमींच्या घरापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून चिकमहूद परिसरात तरस वन्यप्राण्याचा वावर सातत्याने दिसून येत आहे. दरम्यान, पारुबाई कोळी या तीन वर्षाच्या नातवासह शेतात चारा आणण्यासाठी गेल्या होत्या.

त्यांनी नातवाला शेताच्या बांधावर बसवून चाऱ्याच्या पेंड्या गोळा करीत असताना याचवेळी दबा धरून बसलेल्या तरसाने नातवावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

प्रसंगावधान राखत पारुबाई कोळी यांनी तत्काळ नातवाकडे धाव घेत त्याला आपल्यासमोर धरले. त्याच क्षणी तरसाने त्यांच्यावर झडप घातली.

त्यांच्या एका हाताला ओरखडे पडले होते. यानंतर पारूबाई कोळी यांनी धाडसाने दगड उचलून तरसावर फेकला व आरडाओरडा करत नातवाला घेऊन घराकडे धाव घेतली. धावत असताना त्या एक-दोन वेळा पडल्याने त्यांच्या हातापायांना मुका मार लागला आहे.

नागरिकांनी धाव घेतली
आरडाओरड्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. यावेळी नागरिकांची चाहूल लागताच तरस तेथून पळून गेला. या हल्ल्यात पारुबाई कोळी यांना दुखापत झाली असून, या घटनेमुळे आजी व नातू दोघेही प्रचंड घाबरून गेले होते.
चिकमहूद परिसरातील तरस वन्यप्राण्याचा बंदोबस्त करावा या सदराखाली २० डिसेंबर रोजी ‘लोकमत’ मध्ये बातमीच्या माध्यमातून प्रकाश टाकला होता.
तसेच तरसाविषयी माहिती देऊनही वनविभागाकडून दखल घेतली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वनविभागाने या घटनेची दखल घेऊन वाड्यावस्त्यांवर गस्त वाढवावी आणि तरसाचा बंदोबस्त करावा.-सुरेश कदम, माजी उपसरपंच
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












