मंगळवेढा टाईम्स न्युज ।
मंगळवेढा शहरातील राऊत वस्ती येथील शेतकरी नितीन राऊत यांच्या गोठ्यावर बिबट्यासदृश प्राण्याने हल्ला करत रेडी फस्त केली. राऊत यांच्या शेतातील जनावरांच्या शेडमध्ये आज पहाटे ही घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बिबट्यासदृश प्राण्याने पहाटे जनावरांच्या शेडमध्ये घुसत रेडीवर ताव मारला. पोट भरल्यानंतर बिबट्यासदृश प्राण्याने अधर्वट खाल्लेली रेडी तेथेच सोडून दिली.

याबाबत मंगळवेढा वनक्षेत्रपाल मुंढे यांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी वन विभाग कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले असून पंचनामा करण्यात येत आहे.

गणेशवाडी परिसरात फिरणारा तो बिबटया नसून तरस प्राणी असल्याची वनविभागाची माहिती
गणेशवाडी व लेंडवे चिंचाळे परिसरात बिबटया फिरत असल्याचा एक व्हिडीओ प्रसार माध्यमांवर प्रसारित झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून

सदर ठिकाणी वन विभागाच्या पथकाने भेट देवून वस्तूनिष्ठ माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते ठसे बिबटयाचे नसून तरस प्राण्याचे असावेत असा अंदाज वन विभागाने व्यक्त करून नागरिकांनी दक्षता घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

दि.23 डिसेंबर रोजी गणेशवाडी व लेंडवे चिंचाळे परिसरात एक बिबटया फिरत असल्याचा व्हिडीओ सर्व प्रसार माध्यमावर व्हायरल झाला होता.याबाबत तेथील पोलिस पाटील संजय मेटकरी यांनी वन विभागाच्या अधिकार्यांना कॉल करून बिबटया फिरत असल्याची माहिती दिल्यानंतर पंढरपूर विभागाच्या वन परिक्षक अधिकारी शितल चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संतोष मुंडे,वनसेवक भागवत मासाळ आदींनी सदर ठिकाणी भेट देवून त्या ठशाची सुक्ष्म पाहणी केली असता ते ठसे तरस प्राण्याचे असावेत असा त्यांनी अंदाज व्यक्त केला.

तरस हा प्राणी माणसावर हल्ला करत नसून तो मृत जनावरांचे मांस भक्षण करतो.असे सांगण्यात आले.पशूपालकांनी आपली जनावरे गोठयात सुरक्षीत ठिकाणी बांधून त्यांची दक्षता घ्यावी तसेच पालकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन वन विभाग प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान मंगळवारी सायंकाळी 7.30 वा. त्या प्राण्याने एका गणेशवाडीकडे जाणार्या तुकाराम कोळेकर या शिक्षकाच्या चार चाकी गाडीवर झडप मारली असून तो गोशाळेच्या पाठीमागच्या तळयाच्या दिशेने गेलेला असल्याबाबत मेसेज सोशल मिडीयावर सर्वत्र फिरत असून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













