मंगळवेढा टाईम्स न्युज ।
बेकायदेशीर वाळू उपसा करत असताना याची माहिती दिल्याच्या संशयावरून गणपती अकोले (ता. माढा) येथील वकिलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
ही घटना ३ डिसेंबर रोजी घडली. गंभीर जखमी अॅड. पांडुरंग कुबेर तोडकर (वय ३२ वर्षे, रा. गणपती अकोले) यांना उपचारासाठी पुणे येथे दाखल केले आहे. या प्रकरणी पुणे येथे जबाब घेऊन ८ डिसेंबर रोजी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा नोंदला आहे.

सोनू उर्फ विक्रम पराडे, अमर उर्फ छोटू पराडे, अक्षय गुंड, आण्णा पराडे व इतर ७ ते ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

तर कंदर (ता. करमाळा) येथील राहुल विलास चव्हाण यांचा फिर्यादीवरून अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत परस्पर विरोधी लक्ष्मण कुटे, सोमेश्वर तोडकर, पांडुरंग तोडकर, गणेश तोडकर (तिघे रा. अकोले खुर्द), औदुंबर कुटे, नागेश लोंढे (सर्व रा. टेंभुर्णी) यांच्या विरोधात गुन्हा नोंदला आहे.

पोलिस सूत्रानुसार ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पांडुरंग तोडकर हे त्यांच्या शेतास पाणी देण्यासाठी गेले असता फिर्यादीस मित्र लखन कुटे याने सोनू उर्फ विक्रम पराडे यास फोन करण्यास सांगितले,

त्यानुसार फोन केला असता सोनू याने त्रिमूर्ती हॉटेल योगीराज पेट्रोलपंप शेजारी बोलावून घेऊन आम्ही वाळू उपसा करतो, तू आमचे नाव अधिकाऱ्यास का सांगतो? असे म्हणून प्राणघातक हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














