टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील माणगंगा परिवार अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी बँकेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त उद्या सकाळी 7 वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष नितीन इंगोले यांनी दिली आहे.

मंगळवेढा शहरातील इयत्ता 4 व 5 वीच्या मुलांसाठी व मुलींसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे.
सकाळी 7 वाजता राजयोग हॉटेल माणगंगा बँकेपासून दामाजी चौक, शिवप्रेमी चौक, चोखामेळा चौक, मुरलीधर चौक, ते किल्लेदार दुकान पासून चोखामेळा चौक तेथून शिवप्रेमी चौक शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा येथे शेवट होणार आहे.

मुले गटातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना 5 हजार 500 रुपये, द्वितीय बक्षीस 4 हजार 500, तृतीय क्रमांक बक्षीस 3 हजार 500 व उत्तेजनार्थ 3 बक्षिसे देण्यात येणार आहेत.
मुली गटातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीला 5 हजार 500 रुपये, द्वितीय बक्षीस 4 हजार 500, तृतीय क्रमांक बक्षीस 3 हजार 500 व उत्तेजनार्थ 3 बक्षिसे देण्यात येणार आहेत.

उद्या दि.14 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता शिवप्रेमी चौक अश्वारूढ पुतळा येथे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘या’ नंबरवर संपर्क साधावा
इयत्ता 4 थी व 5 वीच्या विद्यार्थ्यांना मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 8308645100 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









