मंगळवेढा टाइम्स न्युज।
मंगळवेढा मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया औपचारिकपणे सुरू झाली. मात्र, दुसऱ्याच दिवशी या निवडणुकीला रंग चढू लागला आहे.

प्रभाग क्रमांक ५ (अ) मधील मागास प्रवर्ग जागेसाठी मोहम्मदमुस्तफा अहमद मुलाणी यांनी दोन अर्ज दाखल केले. त्यांनी एक अर्ज भाजपच्या उमेदवार म्हणून,

तर दुसरा अपक्ष उमेदवार म्हणून दाखल केला आहे. नगराध्यक्षपदासाठी मात्र मंगळवार, दि.११ रोजी अखेरपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही.

प्रमुख राजकीय पक्षांकडून अद्याप अधिकृत उमेदवार निश्चित झाले नसल्याने पुढील काही दिवसांत अर्ज दाखल प्रक्रियेला वेग करण्याच्या येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मंगळवेढा नगरपरिषदेत एकूण १० प्रभागांमधून २० नगरसेवक निवडले जाणार असून, यासोबत नगराध्यक्षपदासाठीही मतदान होणार आहे.

असा राहील कार्यक्रम
१) अर्ज दाखल करण्याची मुदत : १० ते १७ नोव्हेंबर, २) ‘ए’ आणि ‘बी’ फॉर्म सादरीकरणाची शेवटची तारीख : १७ नोव्हेंबर, ३) अर्ज छाननी : १८ नोव्हेंबर ४) अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : २१ नोव्हेंबर, ५) मतदान : २ डिसेंबर ६) मतमोजणी : ३ डिसेंबर

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











