टीम मंगळवेढा टाइम्स।
मंगळवेढा तालुक्यातील सर्व तलाठी कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालय येथे ऍग्रीस्टॅक नोंदणी बाबत आज कॅम्प आयोजित केला असून ज्यांनी अद्याप नोंदणी केली नसेल त्या शेतकऱ्यांनी आजच आपला फार्मर आयडी काढून घ्यावा असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.

दरम्यान, अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदत मिळण्यास अडचणी ठरत असल्यामुळे आज फार्मर आयडी काढून घ्यावा ज्याने करून मदत थेट खात्यात जमा होणार आहे.
आधार कार्डप्रमाणे आता केंद्र सरकारने शेतकरी ओळख क्रमांक मिळविण्याबाबतची नोंदणी सुरू झाली आहे. मंगळवेढा तालुक्यात शेतकऱ्यांची ॲग्रीस्टिकच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची ‘कुंडली’च कळणार आहे.

विविध शासकीय योजनांच्या लाभांसह कर्ज मिळवण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे. स्थानिक पातळीवर महसूल, कृषी, ग्रामसेवक,सरपंच सीएससी सेंटर, सेतू केंद्र चालक आणि ग्रामविकासच्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी सुरू असून सर्वांनी यामध्ये मदत करणे आवश्यक असल्याचे आवाहन केले आहे.

राज्यामध्ये कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने वापर व परिणामकारकरीत्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे, याकरिता केंद्र शासनाची ‘अॅग्रिस्टॅक’ योजना राबविण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे.
ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रामार्फत मदत घेऊन शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करावयाची असून शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प फायद्याचा आहे.

अॅग्रिस्टॅक’ काढल्यामुळे थोडक्यात शेतकरी ओळखपत्राच्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो. शेतकरी योजनांमधून कर्जासारख्या सेवेचा लाभ घेण्यासाठी याचा फायदा होणार असल्याचे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याची नोंदणी करून घेण्याचे आव्हान तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










