मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी विरोधक मतदारयाद्यांमधील कथित घोळावरून आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षांतील सर्व प्रमुख नेत्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे. पण या मोर्चाआधीच राज्य निवडणूक आयोगाने मतदारयाद्यांबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा व गोंदिया हे जिल्हे वगळून उर्वरित सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.

आयोगाने यापूर्वी 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वजनिक निवडणुकीसाठीच्या मतदारयाद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

अंतिम मतदारयादी प्रसिध्द करण्याची मुदत 27 ऑक्टोबर ही होती. पण आता त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याप्रमाणे दुबार मतदारांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीतील दुबार नावांबाबत करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात सूचना निर्गमित करण्यात येत असून

त्यानुसार दुबार नावाबाबत आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने करावी, असे राज्य आयोगाचे उप सचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांच्या पत्रात म्हटले आहे.

आयोगाच्या या आदेशामुळे 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या मतदारयाद्या प्रसिध्द करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. पत्रानुसार, निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अधिप्रमाणित करण्याची अंतिम मुदत 3 नोव्हेंबर ही असेल.

तसेच या मतदारयाद्या माहिती ठेवण्यात आल्या आहेत, याबाबतची सूचना प्रसिध्द करण्याची तारीखही 3 नोव्हेंबर ही असेल. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदारयादी 12 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द केली जाईल.
दरम्यान, विरोधी पक्षांनी मतदानयाद्यांमधील अनेक त्रुटी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये दुबार नावांचा मुद्दाही प्रकर्षाने मांडण्यात आला होता.

आता आयोगाने दुबार नावांबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. विरोधकांच्या मोर्चाआधीच आयोगाने जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांबाबत हा निर्णय घेतला आहे.(स्रोत:सरकारनामा)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













