टीम मंगळवेढा टाईम्स ।
चोरी करण्यासाठी चोरटे वेगवेगळी शक्कल लढवत असतात. रात्री दरोडा टाकण्यासोबत दिवसा रोडवर जाणाऱ्या महिला, वृद्ध यांना टार्गेट करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
मात्र मंगळवेढा तालुक्यात चोरट्यांनी चोरी करण्याचा नवा फंडा सुरू केला आहे. एखाद्या व्यक्तीला गाठत पोलीस असल्याची बतावणी हे चोरटे करतात. यानंतर संधी मिळताच दागिने घेऊन पसार होत असल्याचे प्रकार घडले आहेत.
मंगळवेढा-ढवळस रोड परिसरात एका वृद्धाला ‘मी पोलिस आहे, अशी बतावणी करून एका अज्ञात इसमाने सोन्याची अंगठी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल आहे.
फिर्यादी युवराज संभाजी क्षीरसागर (वय ७८, रा. सप्तशृंगी नगर, मंगळवेढा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५.१५ वाजता सप्तशृंगी मंदिराजवळील रस्त्यावर हा प्रकार घडला.
अनोळखी इसमाने अंगाने सडपातळ, वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे, उंची सुमारे सहा फूट, अंगात फिकट पांढऱ्या रंगाचा शर्ट-पॅन्ट व डोक्यावर पांढरी टोपी घातलेला होता.
तो मराठीत बोलत वृद्धाजवळ आला. ‘मी पोलिस आहे, येथे चाकू घेऊन चोऱ्या होतात. तुम्ही अंगठी घालून फिरू नका. ती माझ्याकडे द्या, मी सुरक्षित ठेवतो’, अशी बतावणी करून त्याने फिर्यार्दीची सुमारे २५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी फसवणूक करून घेतली.
निवडणुका जवळ; तरी अनेकांना उत्सुकता
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जानेवारी महिन्यात गेल्या आहेत. रखडलेल्या निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढसंबंधित मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने केलेल्या मागणीवर न्यायालयात सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने निवडणुकीसाठी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. अशातच निवडणुका लांबणीवर पडल्याने अनेकांचा हिरमोड झाला तर काहींना अवधी मिळाल्याने मोर्चेबांधणीवर भर देत आहेत.
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यामुळे अनेकांना आता अध्यक्ष होण्याचे स्वप्ने पडत आहेत. आपापल्या नेत्यांच्या माध्यमातून आतापासून तयारी सुरू केली आहे.
मात्र, जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर न झाल्याने कोणत्या गटातून निवडणूक लढवायची, असा प्रश्न पडला आहे. जिल्हा परिषदेची चावी कोणाच्या हातात जाणार, याचीही उत्सुकता लागली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज