टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील शेलेवाडी येथील अमर बाबासाहेब सावंत (वय २०) या तरुणावर जुन्या भांडणाचा राग मनात धरून मारहाण करण्यात आली.
ही मंगळवेढा-सांगोला घटना रोडवरील कचरेवाडी ब्रिजजवळ ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.
फिर्यादी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋतिक सुरेश काळुंखे (रा.शेलेवाडी) आणि त्याच्यासोबतचे तीन अनोळखी इसम यांनी संगनमत करून हल्ला केला.
‘तू माझ्या घरी का सांगितले, तुला लय मस्ती आली आहे का?’ असे म्हणत काळुंखे याने सोबत आणलेल्या लहान पीव्हीसी पाइपने सावंत यांच्या पाठीत, डोक्यावर, पायावर व मांडीवर मारून गंभीर दुखापत केली.
सोबतच्या इसमांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. यावेळी फिर्यादीचा मोबाइल हिसकावून घेतला आणि खिशातील २,७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
इतकेच नव्हे, तर फिर्यादीला माफी मागायला लावून त्याचा व्हिडीओ मोबाइलमध्ये टिपला असल्याची तक्रार आहे.
या प्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, पो.ह. कॉ. व्हरे पुढील तपास करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज