टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील धर्मगाव येथील नदीतून बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणाऱ्या विना नंबर ४०७ या टेम्पोवर कारवाई करीत सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आकाश शंकर चौगुले, विठ्ठल बिरा चौगुले (रा. शांतीनगर, मंगळवेढा), विशाल इरकर (रा.भाळवणी, ता. मंगळवेढा), अनिकेत गायकवाड, महादेव इरकर या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद ढवळसचे तलाठी महामुद वजुद्दिन काझी यांनी दिली आहे. नऊ सप्टेंबर रोजी रात्री ३ वाजण्याच्या सुमारास
धर्मगाव गावातील माण नदीपात्रात ४०७टेम्पो हौदामध्ये अंदाजे ७ हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू बेकायदेशीररित्या चोरुन भरत असताना
आकाश चौगुले, विठ्ठल चौगुले व विशाल इरकर हे मिळून आले. तर अनिकेत गायकवाड व महादेव इरकर हे तलाठी येत असल्याची चाहुल लागल्याने पळून गेले.
या प्रकरणी ७ हजार रुपये किमतीची अंदाजे एक ब्रास वाळू व वाहन असा एकूण ३ लाख ५७हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई तहसीलदार मदन जाधव तसेच पोलीस निरीक्षक बोरिगिड्ढे आणि पथक यांनी संयुक्तरित्या केली आहे.
तहसील कार्यालयाकडे येणाऱ्या रस्त्यावरील कचरा हटवला
मंगळवेढा तहसील कार्यालयाकडे स्मशानभूमीकडून जाणाऱ्या रस्त्याशेजारी नगरपालिकेच्या कचरा डेपोमुळे मुख्य रस्त्यावरती कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरून नागरिकांना जाणे येणे मुश्किल झाल्याने तेथील कचऱ्याची तत्काळ विल्हेवाट लावून त्या कचऱ्याच्या डेपोला तारेचे कंपाउंड मारून जाळी बसवावी,
अन्यथा तेथील कचरा गोळा करून मुख्याधिकाऱ्यांचे दालन कचऱ्याने भरू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मंगळवेढा नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी माळी यांना दिले आहे.
मंगळवेढा तह सील कार्यालयाकडील येणाऱ्या मुख्य रस्त्यावरती कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. तो रस्ता बनवण्यासाठी मंगळवेढा नगरपरिषदेने ५० लाख रुपये खर्च केलेले आहेत.
सदर ठिकाणच्या कचऱ्यातील विल्हेवाट लावून त्या कचऱ्याच्या डेपोला तारेचे कंपाउंड मारून जाळी बसवावी, अन्यथा तेथील कचरा गोळा करून मुख्याधिकाऱ्यांचे दालन कचऱ्याने भरू असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी किशोर दत्तू, पोपट घुले, पप्पू दत्तू आदी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज