टीम मंगळवेढा टाईम्स ।
मराठा समाजाच्या ज्वलंत प्रश्नावरून मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांचे मौन समाज बांधवांना चांगलेच जाणवू लागले आहे. निवडणुका आल्या की ‘एक गठ्ठा मतांसाठी’ मराठा समाजाची आठवण काढणारे हेच नेते, आरक्षणासारख्या अस्मितेच्या प्रश्नावर मात्र अचानक ‘बहिरे’ का झाले आहेत? हा प्रश्न आता समाजामध्ये थेट विचारला जातो आहे.
मनोज जरांगे-पाटील यांनी उभारलेला आरक्षणाचा लढा हा आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात पोहोचला आहे. समाजातील कार्यकर्ते खेड्यापाड्यात घोंगडी बैठका घेऊन लोकजागृती करत आहेत. मात्र, मंगळवेढ्यातील राजकीय नेते मात्र जणू “या आगीतून हात भाजून घेऊ नये” अशा भूमिकेत असल्याचे चित्र दिसते.
याआधी निवडणुकीच्या तोंडावर जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी या नेत्यांत स्पर्धा लागली होती. पण निवडणुका संपताच समाजाच्या अस्मितेचा प्रश्न असलेल्या आंदोलनात ते गायबच ! अशा दुहेरी चेहऱ्याच्या राजकारणाला समाज आता वैतागला आहे,
‘केवळ मतपेटीसाठी मराठा, अन्यथा ओझं’ अशी नेत्यांची वागणूक उघडी पडल्याने मंगळवेढ्यातील मराठा बांधवांमध्ये तीव्र असंतोष आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी क्षेत्रातील निवडणुका तोंडावर आहेत.
समाजाच्या मनातील ही खदखद जर मतपेटीत उफाळून आली, तर प्रस्थापित नेत्यांचे गणित पूर्णपणे बदलू शकते. फक्त भाषणांतून मोठे बोलणारे, पण अस्मितेच्या लढ्यात एक पाऊलही न टाकणारे नेते पुढेही टिकतील का? की समाजातून नवे नेतृत्व उभे राहील हे आता थेट मतदारांनीच ठरवायचे आहे.
गेल्या एक महिन्यापासून तालुक्यातील गावांमध्ये चावडी बैठका घेऊन मराठा समाजाला मोठ्या संख्येने मुंबईकडे जाण्यासंबंधीचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. त्यामुळे हजारो गाड्या तालुक्यातून आज निघतील असे चित्र निर्माण झाले आहे.
जेव्हा जेव्हा जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटीत उपोषण केले तेव्हा तेव्हा मंगळवेढ्यात देखील आमरण उपोषण उभे राहिले. त्यामुळे तालुक्याचे आरक्षण लढ्यात महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. तेही सर्वसामान्य मराठा बांधवांचे… त्यामुळे या पुढचा लढा देखील सर्वसामान्य मराठाच लढणार आहेत आणि जशी वेळ येईल तसा हिशोबही चुकता करतील, यात शंका नाही.
जातीच्या जीवावर यश मिळवले
मराठा समाजाच्या अनेक पुढाऱ्यांनी आजपर्यंत आपल्या जातीच्या जीवावर राजकारणात मोठे यश मिळवले, सर्वच राजकीय पक्षात मराठा समाजाच्या नेत्यांना मानाचे स्थान आहे. त्यामुळे या आंदोलनाला पुढाऱ्यांनी काही ठिकाणी हात झटकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आशा नेत्यांना समाज जागा दाखवतीलच यात शंका नाही..!
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज