मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा येथील रतनचंद शहा सहकारी या बँकेच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणूकमध्ये ३०.९३ टक्के इतके मतदान झाले आहे. यामध्ये १४ हजार ९३२ एकूण मतदार होते त्यापैकी ४६१९ सभासदांनी मतदान केले आहे.
या बँकेच्या दहा शाखा असून या ठिकाणी काल मतदान झाले. ही निवडणूक सर्वसाधारण दहा जागेसाठी व इतर मागास प्रवर्ग एक असे मिळून ११ जागेसाठी झाली आहे.
सर्वसाधारण जागेमध्ये ११ उमेदवार उभे असून त्यामध्ये दहा उमेदवार निवडून येणार आहेत, तर मागास प्रवर्ग एकमधून दोन उमेदवार उभे असून त्यामध्ये एक उमेदवार निवडून येणार आहे.
अशी ही निवडणूक असून एकूण ११ जागेसाठी तेरा उमेदवार रिंगणात आहे. त्यामध्ये एकाच उमेदवाराने दोन वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर चार उमेदवार बिनविरोध झाले आहेत.
इतर मागास प्रवर्ग एक जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये दामाजी ग्रामपंचायतचे सरपंच उमेदवार जमीर सुतार यांचे सर्वसाधारण व इतर मागास प्रवर्ग एकमध्ये असे दोन उमेदवार म्हणून त्याने दोन जागेसाठी निवडणूक लढवली आहे.
त्यामुळे या निवडणुकीकडे सभासदाने केवळ एका उमेदवाराने दोन ठिकाणी अर्ज ठेवल्याने ही निवडणूक लागल्याची चर्चा रंगली होती. मात्र, अखेरी निवडणूक झाली. मात्र, सभासदांनी यावेळी या निवडणुकीकडे पाठ फिरवली आहे.
निवडणूक एकतर्फी होणार की विरोधी गटाच्या एका उमेदवाराचा दोन ठिकाणी चमत्कार होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. आज सोमवार, दि.२८ जुलै रोजी सकाळी पंढरपूर रोडवरील वीरशवमंगल कार्यालय सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.
माजी संचालक मतदान केंद्रावर ठाम मांडून..
निवडणुकीदरम्यान बँकेचे चेअरमन राहुल शहा, अनिल सावंत जगताप, मुझफ्फर काझी, उत्तम खांडेकर, चंद्रशेखर कोंडुमैरी, संतोष रणदिवे, किरण क्षीरसागर, अंबादास बेंद्रे, संतोष बुरुकुल, अजीम शेख, महादेव माळी यांच्यासह अनेक आजी-माजी संचालक मंगळवेढा येथील नगरपालिका शाळा नंबर एक व जवाहर हायस्कूल या ठिकाणी मतदान केंद्र असल्याने ठाम मांडून होते,
तर डीसीसी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बबनराव अवताडे तसेच खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर अवताडे, विरोधी गटाचे उमेदवार उमेदवार जमीर सुतार यांनी या मतदान केंद्रावर फेरफटका मारला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज