मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सासूकडून देण्यात आलेल्या शिव्याशापानंतर सूनेने टोकाचे पाऊल उचलले. झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार मंगळवेढा येथील नागणेवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.
शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास माधुरी हिला तिची सासू हिने, माझ्या मुलाचे तू वाटोळे केले, कोठे तरी मर जा असे म्हणून शिवीगाळ केली.
यानंतर महिलेने हिने झोपेच्या सहा गोळ्या खाल्ल्याने तिला चक्कर येण्याचा त्रास होऊ लागला.
मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचार करण्यासाठी सिव्हिल रुग्णालयात उपचारास दाखल केले. विवाहितेची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
कर्ज फेडण्यासाठी २ लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या तिघांवर गुन्हा दाखल
विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन कर्ज फेडण्यासाठी दोन लाख रुपये घेवून ये म्हणत विवाहितेचा छळ केला व दुसऱ्या महिलेशी विवाह केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर सदर बझार पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत उमा सुरेश वड्डेपल्ली (वय ३३ रा. ३८ न्यू जगजीवनराम झोपडपट्टी सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती सुरेश वड्डेपल्ली,
सासू नागप्पा व जमुना बोगे (रा. ५३४ नवीन विडी घरकुल, कुंभारी सोलापूर) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विवाहिता सन २०१२ ते ११ जून २०२१ दरम्यान सासरी नांदत होत्या. आरोपीनी विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेतला.
बचत गट काढून कर्ज फेडण्यासाठी दोन लाख रुपये घेवून ये म्हणत पती सुरेश याने उमा यांच्या संमतीविना कमला नावाच्या महिलेशी विवाह केला. उमा हीस मानसिक, शारिरीक त्रास देवून मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी देत माहेरी हाकलून दिल्याचे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज