mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 24, 2025
in मंगळवेढा
पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कृष्णा खोरे पाणी संघर्ष चळवळीचे संस्थापक निमंत्रक पद्मभूषण क्रांतिवीर स्व. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी आणि कृष्णा खोरे पाणी संघर्ष चळवळीचे अध्यक्ष आ. भाई स्व. डॉ. गणपतराव देशमुख यांचेसह स्व.आर. आर. पाटील, साथी स्व. निळूभाऊ फुले, भारत पाटणकर यांच्या प्रेरणेतून अथकपणे पाण्यासाठी लढा उभा राहिला.

पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं हा चळवळीचा केंद्रवर्ती हेतू ठेवून शेतकर्‍याच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही, या ध्यासाने पाण्यासाठीची संघर्ष चळवळ उभी राहिली. या वर्षीची ३३ वी पाणी संघर्ष परिषद सिद्धनाथ मंगल कार्यालय, शेटफळे ता. आटपाडी  येथे

गुरूवार २६ जून रोजी दु. १ वाजता लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने कृष्णा खोर्‍यातील तेरा दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील आणि विशेषत: आटपाडी, सांगोले, मंगळवेढा व जत तालुक्यातील जनतेची ३३ वी पाणी संघर्ष परिषद होणार आहे. अशी माहिती कृष्णा खोरे पाणी संघर्ष चळवळीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे दिली आहे.

शेतकर्‍याच्या हितासाठी आणि कल्याणासाठी संघर्षातून हक्काचे पाणी मिळू शकते. भीमा, माण व कोरडा नदीला कालव्याचा दर्जा देणे मंगळवेढा उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी. उजनी उजवा कालवा व जत, सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ ६ व्या टप्प्यातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यास निधीची व्यवस्था करण्यासाठी,

माण व भीमा नदीवर बॅरेगेट बांधणे यासह पाण्यासंदर्भातील अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी ही पाणी संघर्ष परिषद होत आहे.  या परिषदेचे निमंत्रक वैभवकाका नागनाथ नायकवडी हे आहेत.

दुपारी १ वाजल्यापासून सुरू होणार्‍या ३३ व्या पाणी संघर्ष परिषदेमध्ये ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. बाबुराव गुरव, माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख, आ. डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, अ‍ॅड. सुभाष पाटील, प्रा. आर. एस. चोपडे, प्रा. बाळासाहेब नायकवडी, विश्वंभर बाबर,  प्रा. सी. पी. गायकवाड, अ‍ॅड. सरफराज बागवान, प्रा. दत्ताजीराव जाधव हे प्रमुख वक्ते सहभागी आहेत.

पिढ्या न पिढ्या दुष्काळाशी सामना करणार्‍या शेतकर्‍यांना कृष्णा खोर्‍यातील आपल्या हक्काचे पाणी मिळावे यासाठीचा संघर्ष पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी या देशभक्ताने ११ जुलै १९९३ रोजी पहिली पाणी परिषद घेऊन पुकारला. त्याला आता ३२ वर्षे पूर्ण होत आहेत.

आटपाडी तालुका केंद्रबिंदू मानून सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील तेरा दुष्काळी तालुक्यातील जनतेची चळवळ उभी केली. स्व. नागनाथअण्णा व स्व. आ. भाई डॉ. गणपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पाणी संघर्ष चळवळीच्या माध्यमातून अत्यंत चिवटपणे जनतेने लढा देऊन सरकारला  कृष्णा खोरे विकास महामंडाळाची स्थापना करायला भाग पाडले.

गेल्या १० वर्षांपूर्वी आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ तलावात पाणी आले. पाणी संघर्ष परिषदेचा हा आजवरचा यशस्वी इतिहास आहे. हा एका दीर्घ लढ्याचा इतिहास आहे. अपूर्ण कामांच्या आणि हक्काच्या पाणी लढाईसाठी अजूनही शेतकर्‍यांना लढावे लागणार आहे.

त्यासाठीच या पाणी परिषदेचे आयोजन करण्यात  आले आहे. तरी सर्व दुष्काळग्रस्त तालुक्यातील बंधू-भगिनींनी हजारोंच्या संख्येने ३३ व्या पाणी परिषदेस उपस्थित राहावे असे आवाहन पाणी संघर्ष चळवळचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पाणी परिषदप्रा.शिवाजीराव काळुंगे

संबंधित बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मोजकेच प्लॉट शिल्लक! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

August 3, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

धक्कादायक! सासूकडून देण्यात आलेल्या शिव्याशापानंतर सूनेने उचलले टोकाचे पाऊल, मंगळवेढ्यातील घटना; सून हॉस्पिटलमध्ये दाखल, प्रकृती...

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा