मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
विकसित गाव या संकल्पनेतून करमाळा तालुक्यातील फिसरे येथे बुधवारी सेंद्रिय शेती, जलतारा प्रकल्प व हरित वारी या मार्गदर्शनपर शिबिराचा शुभारंभ पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी पोलिस अधीक्षकांनी सहा गावं दत्तक घेतली.
यावेळी भरत अवताडे यांनी पिकविलेल्या सेंद्रिय शेतीची पाहणी पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी करून या पाहणी दौऱ्यातून विषमुक्त भाजीपाला, फळे तयार करणे अभिप्रेत आहे.
त्यातून गावची आर्थिक परिस्थिती सुधारून गाव गुन्हेगारी मुक्त करणे हा मुख्य उद्देश आहे
त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या चारही बाजूंनी रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करून हरित वारी हा उपक्रम राबविण्याचे धोरण असल्याचे पोलिस अधीक्षकांनी यावेळी स्पष्ट केले.
तालुक्यातील सर्व पोलिस पाटील शेतीतज्ञ यांच्यासह यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे-पाटील यांच्या सहकार्याने हे अभियान राबवले जात आहे.
पोथरेचे पोलिस पाटील संदीप शिंदे-पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर भरत अवताडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी पोलिस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलिस ठाण्याचे कार्यरत पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज