मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
मंगळवेढा तालुक्यातील मारापूर ग्रामपंचायत येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत संलग्न उपभोक्त्या भौतिक सोयी-सुविधांचा १०० टक्के ग्रामपंचायत कर भरणा करणाऱ्या नागरिकांना
आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सरपंच विनायक यादव यांच्या हस्ते घरगुती वापरातील कचरा संकलन करण्यासाठी कचरा पेट्यांचे वितरण करण्यात आले.
केंद्र व राज्य सरकारने गावातील संपूर्ण स्वच्छता करण्याबरोबरच ग्रामीण भागातील सर्व गावांना दृष्यमान स्वच्छतेचा अपेक्षित दर्जा मिळवून ग्रामीण जनतेत स्वच्छतेविषयक वर्तणुकीत बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने
राज्यात १ मे पासून ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ अभियान राबविण्यास प्रारंभ झाला असून या अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांनी यावेळी केले.
यावेळी उपसरपंच अशोक आसबे, सोसायटीचे चेअरमन राजकुमार यादव, ग्रामविस्तार अधिकारी जमीर मुलाणी, नाथबाबा माने, गणपत यादव, परमेश्वर यादव, अंकुश माने, दासू वाघमारे, सागर यादव, अभिमन्यू माने, अशोक वाघमारे, किरण यादव आदी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज