मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी मिळणे आता अवघड झाले आहे. खासगी शाळांमध्ये मिळणाऱ्या सुविधा यामुळे पालक वर्गात आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये पाठवण्याचा कल वाढला आहे.
या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा टिकण्यासाठी आणि शाळा वाचविण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील कोर्टी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. यात जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी आणि पाणी कर माफ करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे १९३२ पासून जिल्हा परिषद मराठी शाळा सुरू आहे. पहिली ते चौथीपर्यंत मराठी शाळा सुरळीत सुरू होती. त्यातून अनेक विद्यार्थी घडले आहेत. मात्र, आजच्या स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आल्या आहे. शाळेत विद्यार्थी मिळणेदेखील कठीण झाले असून,
जिल्हा परिषदेची शाळा कायम सुरू राहावी, यासाठी कोर्टी ग्रामपंचायतीने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद शाळेत कमी प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या होऊ लागली आहे.
खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा तसेच इंग्लिश मीडियम शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळा मागे पडत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.
अर्थात खासगी शाळांमध्ये असलेल्या सुविधा यामुळे पालक वर्ग पाल्यांना जिल्हा परिषद शाळांऐवजी खासगी शाळेत टाकत असतो. यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या कमी होत आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत होत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक गावातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांचा गळतीचा दर पाहता, विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेण्यासाठी मोठ्या संख्येने सामील व्हावे. या चांगल्या उद्देशाने गावातील लोक आणि ग्राम मंडळाच्या सदस्यांच्या मताने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.- शोभा अनिल पवार, सरपंच, कोर्टी
जळगाव जिल्ह्यात पण निर्णय
जळगाव जिल्ह्यातील रुईखेड मायंबा परिसरातील भडगाव मायंबा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, त्यांचे पालकांना ग्रामपंचायतकडून घेतला जाणारा पाणीपट्टी आणि घरपट्टी कर माफ करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
त्यानुसार दि.२४ मे रोजी झालेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांच्या वतीने एकमताने ठराव मंजूर केला गेला आहे.
यामागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे वाढत्या शैक्षणिक स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे भवितव्य टिकवून ठेवणे आणि गावकऱ्यांमध्ये शाळेबाबत जाणीव निर्माण करणे हा आहे.
या उपक्रमाद्वारे सरकारी शाळेची ओढ विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याची अपेक्षा आहे. ग्रामसभेत हनुमान पालकर यांनी हा ठराव वाचून दाखवला,
तर राहुल साखरे यांनी त्याला अनुमोदन दिले. या बैठकीचे अध्यक्ष ग्रामपंचायत सरपंच अनुसया खडके होते.
प्रमुख उपस्थितीमध्ये उपसरपंच प्रवीण इंगळे, ग्रामपंचायत सदस्य राहुल साखरे, शंकर मगर, विजय साखरे, शरद पालकर, धनंजय साखरे, गौतम भटकर, किशोर इंगळे, सुभाष पाटील, गणेश पाटील, सुधाकर पालकर, भगवान शेळके,
भागवत साखरे, वैभव ताडे, रमेश इंगोले, नऊ साखरे, गुलाबराव जाधव, विठ्ठल खडके, अशोक साखरे, संजय साखरे, दीपक खडके, गणेश तायडे, अनिल भटकर, करण मगर, शंकर इच्छित, योगेश इरशीत, रामकृष्ण इंगळे आणि संजय इंगळे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शाळेची ओढ निर्माण करण्यासाठी हा उपक्रम
सरकारी शाळेचे भवितव्य टिकवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शाळेची ओढ निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल.
या निर्णयामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अधिक बळकट होऊन गावकऱ्यांमध्ये शिक्षणासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.-अनुसया खडके, सरपंच
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज