mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

चिंता वाढली : चीनमध्ये दुसरा ‘हा’ व्हायरस सापडला ; साथ येण्याची भीती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
चिंता वाढली : चीनमध्ये दुसरा ‘हा’ व्हायरस सापडला ; साथ येण्याची भीती

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सध्या जगभरात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. तसंच यावरील लस शोधण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. त्यातच या व्हायरची उत्पत्ती चीनमधून झाल्याचा दावाही अनेक देशांकडून करण्यात आला आहे. अशा परिस्थिती चीनमध्ये आणखी एक नवा स्वाईन फ्लू सापडल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे. अमेरिकन सायन्स जर्नल PANS मध्ये यासंदर्भातील अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. हा नवा स्वाईन फ्लू २००९ मध्ये जगभरात पसलेल्या H1N1 चाच जेनेटिकल डिसेंडेंट असल्याचं म्हणत तो अधिक गंभीर स्वरूपाचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. A virus re-discovered in China, fearing an outbreak

“नवा स्वाइन फ्लू इतका शक्तिशाली आहे की तो माणसाला आजारी पाडू शकतो. जर कोरोना साथीच्या वेळी नव्या स्वाइन फ्लूचा संसर्ग पसरला तर तो गंभीर रुप धारण करेल,” असं चीनमधील अनेक विद्यापीठं आणि चीनच्या सेंटर फॉर डिजिस कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शनच्या वैज्ञानिकांकडून सांगण्यात आलं आहे.

नव्या स्वाईन फ्लूला जी ४ असं नाव देण्यात आलं आहे. याचा शोध घेण्यासाठी चीनच्या वैज्ञानिकांनी २०११ ते २०१८ या कालावधीत संशोधन केलं. तसंच यादरम्यान १० राज्यांमधील ३० हजार डुकरांच्या नाकातून नमूने घेतले. तसंच या नमून्यांची तपासणीही करण्यात आली.

यावरून चीनमध्ये १७९ प्रकारचे स्वाईन फ्लू असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांमध्ये जी ४ ला वेगळं करण्यात आलं. ज्या डुकरांच्या नाकातून नमूने घेण्यात आले त्यापैकी सर्वाधित डुकरांमध्ये जी ४ स्वाईन फ्लू असल्याचं दिसून आलं. तसंच तो स्वाईन फ्लू या डुकरांमध्ये २०१६ पासून असल्याचंही समोर आलं. यानंतर वैज्ञानिकांनी जी ४ वर संशोधन सुरू केला. त्यानंतर समोर आलेल्या गोष्टींमधून सर्वांनाच धक्का बसला.

दरम्यान, जी ४ हा स्वाईन फ्लू मानवामध्ये वेगानं आणि गंभीरतेनं पसरू शकतो अशी माहिती संशोधनातून पुढे आली. हा व्हायरस मानवी शरीरात अधिक तीव्रतेनं पसरतो. तसंच हा सीजनल फ्लू असल्यामुळे कोणालाही जी ४ स्वाईन फ्लूपासून इम्युनिटी मिळणार नाही. सामान्य फ्लूपासून रक्षण होत असलं तरी जी ४ गंभीर रुप धारण करु शकतो, असंही वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.

डुकरांच्या फार्ममध्ये काम करणाऱ्या १० पैकी एका कामगारामध्ये जी ४ चा संसर्ग झाल्याचं दिसून आल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. तसंच वैज्ञानिकांनी त्यांच्या अँटीबॉडी टेस्ट केल्या. त्यानंतर त्यांना जी ४ चा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली. २३० जणांच्या केल्या चाचणीत त्यापैकी ४.४ टक्के लोकांना याचं संक्रमण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या हा व्हायरस मानवामध्ये आला असला तरी तो एकाकडून दुसऱ्या व्यक्तीला त्याचा संसर्ग होतो का याची मात्र माहिती मिळालेली नाही. सध्या यावर संशोधन सुरू आहे.

जर हा व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे गेला तर याचे परिणाम गंभीर होती. तसंच ज्या लोकांचं काम डुकरांशी निगडित आहे, अशा लोकांना अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं चीनच्या वैज्ञानिकांनी आपल्या अहवालात नमूद केलं आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshLatest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी स्वीकारला पदभार ; कोरोना नियंत्रणाबरोबरच अर्थव्यवस्थेला गती देणार

नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी स्वीकारला पदभार ; कोरोना नियंत्रणाबरोबरच अर्थव्यवस्थेला गती देणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

August 31, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

August 31, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा