टीम मंगळवेढा टाईम्स । यंदा जूनच्या सुरूवातीलाच पावसाचं आगमन झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच जून महिन्यात महाराष्ट्रातल्या सर्वच भागांत पावसाने हजेरी लावली. 3 जुलै रोजी पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. Warning of heavy rains in these two districts of Maharashtra; Possibility by the Meteorological Department
येत्या 24 तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पवासाची शक्यता वर्तवली गेली आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली गेली आहे.
कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस सुरु आहे. पुढील दोन दिवसांनी कोकणात तसेच पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
येत्या 3 ते 4 दिवसानंतर राज्यातील पावसामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, असं पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितलं.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज