मंगळवेढा टाईम्स टीम । मंगळवेढा येथील असलेल्या अॅड.स्मिता धनंजय पवार (वय 31) या महिलेने बुधवार दि.1 जुलै रोजी दुपारी 2.50 वाजण्यापुर्वी अज्ञात कारणावरून सोलापूर येथील राहते घरात गळफास घेवून आत्महत्या केली.
Suicide by strangulation of female lawyer mangalwedha solapur
महिला वकिलाची गळफास घेवून आत्महत्या @SpSolapurRural pic.twitter.com/mO33jWbtR1
— Mangalwedha Times (@SamadhanFugare) July 1, 2020
याबाबत अधिक माहिती अशी की,मंगळवेढा येथील विठ्ठल गोवे यांची कन्या अॅड.स्मिता हिचा विवाह सोलापूर येथील धनंजय पवार यांचेसमवेत 6 मे 2018 रोजी झाला असून त्या सोलापूर येथील न्यायालयात प्रॅक्टीस करत होत्या.
बुधवार दि. 1 जुलै रोजी दुपारी 2.50 वाजण्यापुर्वी सोलापूरातील जुनी पोलिस लाईन मुरारजी पेठ येथील राहते घरी पहिल्या मजल्याच्या बेडरूम मध्ये अज्ञात कारणावरून नारंगी रंगाच्या साडीने छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आली.
उपचारासाठी तीला सिव्हील हॉस्पीटल सोलापूर येथे दाखल करण्यात आले. परंतू उपचारापुर्वीच ती मयत झाली.त्याची खबर डॉ.अनिकेत मानेकर यांनी पोलिसात दिली असून अधिक तपास हवालदार काझी हे करीत आहेत.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज