मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने महसूल विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भोगवटा वर्ग 2 आणि देवस्थान इनाम वर्ग 3 (दुमाला) या प्रकारातील जमिनी तारण ठेवण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत
या निर्णयामुळे बँका आणि वित्तीय संस्थांना स्पष्ट मार्गदर्शन मिळेल आणि शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुलभ होईल.
बैठकीत झाले महत्त्वाचे ठराव
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, खासदार नितीन पाटील, तसेच विविध सरकारी आणि वित्तीय संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत शेतकऱ्यांना देवस्थान इनाम, भोगवटा वर्ग 2, रेघेखालील कुळ आणि प्रकल्पांसाठी राखीव जमिनी तारण ठेवण्याच्या नियमांमुळे येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली.
बँका आणि वित्तीय संस्था अशा जमिनी तारण स्वीकारण्यास नकार देत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज मिळवणे कठीण जात आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नवीन शासकीय परिपत्रक जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महसूल अधिनियमाच्या तरतुदी लागू
महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र महसूल अधिनियमानुसार भोगवटा वर्ग २ मधील जमिनी तारण ठेवणे आणि कर्ज थकित झाल्यास त्या विक्री करण्याची कायदेशीर तरतूद आहे.
मात्र, बऱ्याच बँकांना या तरतुदींची संपूर्ण माहिती नाही, त्यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बँकांना यासंबंधी माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
लवकरच सुधारित परिपत्रक जाहीर होणार
शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या आधारे कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महसूल विभाग नवीन परिपत्रक जारी करणार आहे. तसेच बँकांना तारण प्रक्रियेसंबंधी स्पष्ट मार्गदर्शन देण्यासाठी आवश्यक सुधारणा केली जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे शेतीसाठी आवश्यक भांडवल उभारणे आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेणे त्यांना अधिक सुलभ होईल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज