टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शेत जमीन प्रकरणाच्या वादातून दोन व्यक्तीची निर्गुण हत्या झाल्याची घटना घडली आहे.
रीना आप्पा ढोबळे (वय 35 रा.गुंजेगाव) व चंद्रकांत तात्यासाहेब पाटील (वय 46 रा.राजापूर ता.सांगोला असे हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना आज सकाळी 9 च्या सुमारास गुंजेगाव-लक्ष्मी दहिवडी रोडवरील ढोबळे वस्ती येथे घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत रीना ढोबळे यांची जमिन गुंजेगाव भागात असून या जमिनीवरून काही जणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता.
या वादातून खून झाले असल्याचे प्राथमिक माहिती मिळत असून हल्लेखोरांनी हातोडा, पाईपच्या साह्याने डोक्याला जबर मारहाण करून जखमी करून खून केला असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजत आहे.
घटनास्थळी पोलीस विभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे, नागेश बनकर आदींनी भेट दिली आहे. या घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, या मयत दोघांना आणखीन कोणत्या कारणांसाठी हत्या केली आहे का? याचा सखोल तपास पोलीस करत असून आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे.
गुंजेगाव येथे शेतातील पाईपलाईनच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी पाचजणांविरुध्द गुन्हे दाखल
गुंजेगाव येथे शेतातील पाईपलाईनच्या कारणावरुन दोन गटात काठीने व लोखंडी गजाने मारहाण झाल्याची घटना घडली असून या घटनेत एकमेकाविरुध्द पाच जणाविरुध्द गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, पहिल्या घटनेत यातील फिर्यादी रिना आप्पा ढोबळे ह्या दि.9 रोजी सायंकाळी 6.30 च्या दरम्यान फिर्यादी व बटईने शेत करणारे चंद्रकांत पाटील शेतात काम करत असताना शेतातील पाईपलाईनला बंद कॅप लावलेला तो काढल्याच्या कारणावरुन
आरोपी लक्ष्मण ढोबळे,लक्ष्मी ढोबळे, तायाप्पा गरंडे यांनी संगणमत करुन शिवीगाळी करत तुला लय मस्ती आली आहे असे म्हणत गज घेवून उजव्या हाताच्या अंगठ्यावर मारुन जखमी केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
तर दुसर्या घटनेत यातील फिर्यादी लक्ष्मण ढोबळे हे दि.9 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता दुध डेअरी वर दुध घालण्याकरिता जात असताना आरोपी रिना ढोबळे, चंद्रकांत पाटील यांनी शेतातील पाईपलाईनचा चेंबर जेसीबीच्या सहाय्याने काढून परत जोडला असल्याने त्यांना विचारना केली असता शिवीगाळी केली होती याचा राग मनात धरुन,
चिडून आरोपीने काठीने व सायकलच्या चैनने पाठीवर मारहाण केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या दोन्ही घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज