टीम मंगळवेढा टाईम्स ।
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मांगंगा परिवाराच्या सांगोला, मंगळवेढा, वाकी (शिवणे) आणि महूद शाखांमध्ये महिलादिन मोठ्या उत्साहात आणि थाटात साजरा करण्यात आला.
या विशेष कार्यक्रमात महिलांच्या योगदानाला सलाम करत, त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक भूमिकेचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि गौरवशाली ऐतिहासिक महिलांच्या प्रतिमापूजनाने झाली. महाराणी जिजाऊ, राणी ताराबाई आणि महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचे स्मरण करून, उपस्थित महिलांना त्यांच्या प्रेरणादायी जीवनचरित्राची माहिती देण्यात आली.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक साक्षरता किती महत्त्वाची आहे, यावर या कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला. “स्त्री हा केवळ कुटुंबाचा आधार नाही,
तर ती समाजाच्या प्रगतीचा मजबूत स्तंभ आहे. त्यामुळे महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन संस्थेच्या चेरमन श्रीमती अर्चना ताई इंगोले यांनी केले.
त्यांनी संयुक्त गुंतवणूक, बचत आणि कंपॉंडिंगचे फायदे समजावून सांगत, महिलांनी लांब पल्ल्याच्या आर्थिक नियोजनाकडे लक्ष द्यावे असे मार्गदर्शन केले. कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी महिलांनीही आर्थिक निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश त्यांनी दिला.
महिलादिनाच्या निमित्ताने महिलांसाठी छोटे-मोठे खेळ, प्रश्नमंजुषा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महिलांनी उत्साहाने या खेळांमध्ये भाग घेतला आणि आपली कौशल्ये सिद्ध केली.
कार्यक्रमात श्रीमती अपेक्षा ताई पाटील यांनी आपल्या मनोगतात माणगंगा परिवाराने महिलांसाठी राबवलेल्या विविध सामाजिक आणि आर्थिक योजनांचे कौतुक केले.
महिलांनी माणगंगा परिवाराच्या विविध योजनांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला स्थानिक महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. सांगोला, मंगळवेढा, वाकी (शिवणे) आणि महूद शाखांमध्ये महिलादिन जल्लोषात साजरा करण्यात आला. महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माणगंगा परिवाराच्या संचालक श्रीमती जयाताई वाघमोडे आणि सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. माणगंगा परिवाराचा हा उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज