मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज राज्यातील ६० अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती देवून त्यांची पदस्थापना करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला. याबाबतचा आदेशही जारी करण्यात आला आहे.
या जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती विविध कारणांमुळे प्रलंबित होती. दरम्यान या अधिकाऱ्यांपैकी २९ अधिकाऱ्यांची जात पडताळणी समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
महसूल विभागातील सेवाजेष्ठता यादी जानेवारी २०२२ मध्ये प्रसिद्ध झाली. अनेक कारणांमुळे ही यादी ३ वर्ष प्रलंबित होती.
काल ही निवड यादी आणि ६० अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. त्यास त्यांची नेमणूकही करण्यात आली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
अतिरिक्त ६० जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना बावनकुळे यांनी त्यातील २९ अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय जात पडताळी समितीचे अध्यक्ष म्हणून नेमले आहे. जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांची ही २९ पदे काही वर्षांपासून रिक्त होती.
तेथे काल नेमणूक झाल्याने समितीच्या कामकाजाला गती मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे ओबीसी, व्हीजेएनटी आणि एन टी संवर्गातील जात पडताळणीची अनेक प्रकरणे तातडीतने मार्गी लागतील अशी आशा आहे.
६० अधिकाऱ्यांची नेमणूक करताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विद्यार्थी वर्गासह सामाजिक आरक्षण घेवून निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना आणि नोकरी करायची इच्छा असणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
बावनकुळेंच्या निर्णयामुळे राज्यातील सर्वच जात पडताळणी समितींना अध्यक्ष मिळाले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज