टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील तीर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वर यात्रेचा शुभारंभ महाशिवरात्री दिवशी होत असून महाशिवरात्रीपासून पुढे पाच दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली.
आज बुधवारी श्रींच्या मूर्तीची महापूजा पहाटे ४ वाजता प्रांताधिकारी बी.आर. माळी, आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे, तहसीलदार मदन जाधव यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली आहे.
आज सायंकाळी ७ वाजता श्रींच्या पालखीचे सवाद्य माचणूर गावातून मंदिराकडे आगमन होणार आहे. या वेळी आतषबाजी केली जाणार आहे.
शनिवारी रोजी भजन, कीर्तन सोहळा. रविवार दि.२ मार्च रोजी सायंकाळी ६ ते ९ दरम्यान श्री च्या पालखीचे मंदिरातून माचणूर गावाकडे मार्गस्थ. आदी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले.
नदीपात्रात पाणी असल्यामुळे भाविकांना अंदाज नाही, दुर्घटना घडण्याची शक्यता असते, प्रशासनाने खबरदारी गरजेचे आहे.
उद्या रात्रभर भेदिक, कलगी-तुऱ्याची रंगणार जुगलबंदी
गुरुवारी सायंकाळी ७ ते सूर्योदयापर्यंत पारंपारिक भेदिक गाण्यांचा कार्यक्रमव कलगीतुरे होणार आहे. संचालक राजेंद्र पाटील यांच्या हस्ते व पोलिस निरीक्षक महेशढवाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
यावेळी शाहीर जगन्नाथ डोके, सुरेश तेली, राजूवाघमारे, जयवंत रणदिवे, हिंदुराव पाटील, काकासाहेब निकम, मेजर रघुनाथ पवार, बन्सीकांबळे, प्रल्हाद क्षीरसागर हे शाहीर आपली कला सादर करणार आहेत.
पहिली कुस्ती दीड लाखाची, राज्यभरातून येणार मल्ल
शुक्रवारी दुपारी २ वाजता जंगी कुस्त्याचे मैदान आयोजित केली आहे. उद्घाटन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे उपस्थित राहणार आहेत. प्रथम निकाली कुस्तीसाठी १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस आमदार समाधान आवताडे यांच्यातर्फे दिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज