मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर शहर व ग्रामीण भागातील परिसरातील अंत्योदय योजनेतील रेशन कार्डधारकांना राज्य शासनाकडून ३५५ रुपयांची कॉटन साडी भेट मिळणार आहे.
राज्य शासनाच्या सूचनेनुसार शहर व ग्रामीण पुरवठा विभागाने लाभार्थ्यांची संख्या शासनाकडे पाठवली असून, लवकरच शासनाकडून साड्या उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर साड्यांचे वाटप होईल, अशी माहिती पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
गुरुवार, १३ मार्च रोजी होळी आहे. होळीनिमित्त साड्यांचे वाटप करण्याची सूचना शासनाने केली आहे. हातमागावर विणलेली साडी लाभार्थ्यांना मिळणार असल्याने कार्ड धारकांमध्ये उत्सुकता आहे.
अंत्योदय योजनेतील शहरातील ६ हजार ८५ लाभार्थ्यांना साड्या मिळणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील जवळपास ५२ हजार जणांना साड्या मिळणार आहेत.
मार्चपूर्वी साड्या वाटपाचे उद्दिष्ट आहे. या योजनेतून राज्यभरातील २४ लाखांहून अधिक लाभार्थी कुटुंबीयांना यापुढे वर्षातून एकदा मोफत साडी मिळणार आहे.
सोलापूर शहरात सहा हजार तर ग्रामीण भागात ५१ हजार ४८० अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत. राज्यात मागच्या वर्षी नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर झाले आहे. सदर धोरण २०२८ पर्यंत लागू राहील.
धोरणांतर्गत रेशन दुकानातून अंत्योदय लाभार्थ्यांना मोफत साडी देण्याचा प्रस्ताव होता. याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
लाभार्थी शिधापत्रिकाधारकांची यादी शासनाकडे पाठवली
राज्य शासनाने किती साड्या लागणार आहेत, त्याची माहिती मागवली आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांची यादी आम्ही पाठवली आहे. मागच्या वर्षीचे ६९ साड्या शिल्लक आहेत. त्या वजा करून लाभार्थी शिधापत्रिकाधारकांची यादी शासनाकडे पाठवली आहे. ओंकार पडोळे, अन्नधान्य वितरण अधिकारी, सोलापूर शहर(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज