टीम मंगळवेढा टाईम्स । पुण्यात शुक्रवारी दिवसभरात ८०७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा नोंद झाली आहे. तसेच पिंपरीत २७६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १९ हजार ८४९वर पोहोचला आहे. तसेच आज उपचारदरम्यान नऊ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील मृतांचा आकडा ६८५ झाला आहे. तर आज ६१९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत पुण्यात १२ हजार २९० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. Number of corona victims in Pune on the threshold of 20,000!
आज पिंपरी-चिंचवड या एकट्या शहरात २७६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यू पैकी एक रुग्ण ग्रामीण भागातला आहे.
आता पिंपरी-चिंचवड मधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार ७७६वर पोहोचला आहे. तर यापैकी आतापर्यंत ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज पिंपरी-चिंचवडमध्ये ७९ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ हजार २३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात २४ तासांत सर्वाधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ९२ हजार ९९०वर पोहोचला असून मृतांचा आकडा ८ हजार ३७६ झाला आहे. तर आतापर्यंत १ लाख ४ हजार ६८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज