टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने लाभार्थी महिलांची अर्जाची छाननी सुरू केली आहे. यासाठी सरकार महिलांना आवाहन देखील करत आहेत. अशात आता सरकारने या अर्जाच्या छाननी प्रक्रियेला आणखीणच वेग दिला आहे.
पुण्यात 21 लाख 11 हजार 991 बहिणींनी योजनेसाठी अर्ज केले होते. यापैकी चारचाकी असलेल्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबद्दल तशी माहिती दिली आहे.
लाडकी बहिणी योजनेसाठी आता अर्जाची पडताळणी सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लाडक्या बहिणीच्या घरी चारचाकी आहे का? याची तपासणी होण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यात घरोघरी होणार तपासणी होणार आहे. तसंच, ‘पुणे जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 5 महिलांनी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ सोडला आहे म्हणूनच प्रशासनाला हे कठोर पाऊल उचलावं लागतंय, अशी प्रतिक्रिया रूपाली चाकणकर यांनी दिली.
राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविकांना लाभार्थी महिलांच्या घरोघरी पाठवणार आहे. अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी होणार आहे. खरं तर महिला आणि बाल कल्याण विभागाने लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सुरू आहे.
या छाननीसाठी आयकर आणि परिवहन विभागाची मदत घेतली जाणार आहे. आयकर विभाग महिलांच्या पैशांचे विवरण सांगणार आहे. तर परिवहन विभाग महिला राहत असलेल्या घरात चारचाकी आहे की नाही? याची माहिती देणार आहे.
‘त्या‘ महिलांना योजनेतून वगळणार?
चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. या संदर्भात सरकार परिवहन विभागाकडून देखील माहिती मिळवत होती. त्यानंतर आता सरकार अंगणवाडी सेविकांना लाभार्थी महिलांच्या घरी पाठवणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सासरे, दीर, अथवा घरातील इतरांच्या नावावर चारचाकी असेल आणि लाभार्थी महिला पती आणि मुलासोबत वेगळी राहत असेल तर या महिलेला योजनेचा लाभ सुरूच राहणार आहे.
सात हप्ते महिलांच्या खात्यात जमा
दरम्यान, लाडकी बहीण योजनेची सुरूवात जुनपासून करण्यात आली होती.त्यानंतर जुलैपासून महिलांच्या खात्यात सरकारने 1500 रूपये जमा करायला सुरूवात केली होती.
आतापर्यंत महिलांच्या खात्यात सात हप्त्याचे 10 हजार 500 रूपये खात्यात जमा झाले आहेत. आता महिलांना फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या 1500 रूपयांची प्रतिक्षा आहे. हे पैसे कदाचित फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज