टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगांव परिसरात शेतामध्ये चार हजार रुपये किमतीची हरभऱ्याची ढिग लावून ठेवलेली आंब चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी गणपत जाधव यांची डोंगरगाव हद्दीत शेती असून त्यांनी त्यांच्या तीन एकर शेतामधील हरभऱ्याची आंब ढिग लावून ठेवली होती.
दि.३० रोजी मध्यरात्री अज्ञात चोरटयांनी यावर डल्ला मारला आहे. या आंबीची किंमत ४ हजार रुपये असून त्या चोरट्याचा शोध पोलिस हवालदार जाधव हे घेत आहेत,
दरम्यान सध्या सुगीचे दिवस काळ्या शिवारात सुरु असून सर्वत्र हरभरा व ज्वारीची पिके काढून पडली आहेत. चोरटे मध्यरात्री पिके चोरून नेण्याचा प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून पिकांचे संरक्षण करावे अशी मागणी पुढे येत आहे. असा प्रकार प्रतिवर्षी सुगीच्या वेळी घडत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज