मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
देशभरामध्ये सुरु करण्यात आलेली ‘वंदे भारत’ ही प्रिमिअर रेल्वे महाराष्ट्रात अनेक मार्गांवर चालवली जाते. मात्र महाराष्ट्रातील एका वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सोलापूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर सोलापूर जिल्ह्यातील जेऊरजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली आहे. या घटनेत वंदे भारत एक्सप्रेसच्या सी-11 डब्ब्याची काच फुटली आहे. सुदैवाने, या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही.
घटना घडल्यावर प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते. अचानक दगडफेक झाल्यामुळे रेल्वेच्या प्रवाशांना घाबरून परिस्थितीला सामोरे जावे लागले. स्थानिक पोलीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडून यासंदर्भातील तपास सुरू आहे.
या दगडफेकीची कारणं अद्याप स्पष्ट झाली नाहीत. काही लोकांच्या हुल्लडबाजीमुळे ही घटना घडली का? किंवा अन्य कोणत्या कारणामुळे दगडफेक केली गेली, याबद्दलची माहिती शोधली जात आहे. रेल्वे पोलिसांनी यासंबंधी तपास सुरू केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे
दगडफेकीमध्ये वंदे भारत एक्सप्रेसच्या सी-11 डब्ब्याची काच फुटली आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. मात्र ही दगडफेक कोणी आणि का केली याबद्दलची माहिती अद्याप मिळालेली नाही. स्थानिक पोलीस आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून यासंदर्भातील तपास केला जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
आतापर्यंत उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अशाप्रकारे वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र आता महाराष्ट्रामध्येही अशी दगडफेक करण्यात आल्याने खरोखरच या बाबतीतही महाराष्ट्राचा युपी, बिहार झालाय का असा प्रश्न विचारला जातोय.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज