मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी भाष्य केलं आहे. आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही, असं स्पष्ट केलं.
ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं. काही अर्जांच्या बाबतीत आम्ही पडताळणीची प्रक्रिया करत आहोत, असं देखील आदिती तटकरे यांनी म्हटलं.
आदिती तटकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत काही तक्रारी आल्या होत्या. आधार कार्ड मिस मॅचच्या तक्रारी आल्या होत्या.
ज्यांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील माहिती जुळत नसल्यास त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं. लाडकी बहीण योजनेबाबत पडताळणीची यंत्रणा तयार करत आहोत, असं देखील त्या म्हणाल्या.
शासन निर्णयात बदल होणार नाही : आदिती तटकरे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. त्यामध्ये कसलाही बदल होणार नाही, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं. ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहेत.
काही महिलांकडून ऑनलाइन अर्ज आणि ऑफलाइन अर्ज आले होते. काही महिलांचं लग्नानंतर स्थलांतर देखील झालं असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या.
चारचाकी वाहनं ज्यांच्या नावावर असतील आणि तरी देखील ज्यांनी अर्ज केला असेल त्यांच्या नावांचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल, असं देखील आदिती तटकरे म्हणाल्या. आधार कार्ड आणि बँकेतील नावात तफावत असल्यास ते अर्जदार पात्र असणार नाहीत, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं.
डिसेंबरची रक्कम 1500 रुपयांप्रमाणं 2100 रुपये कधी मिळणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता. आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सहा हप्ते महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. म्हणजेच आतापर्यंत महिलांच्या खात्यात प्रत्येकी 9 हजार रुपये जमा झाले आहेत.
डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम 1500 रुपयांनुसार महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. महायुतीनं दिलेल्या आश्वासनाप्रमाणं राज्य सरकार लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज