मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्याला पुन्हा डावलण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री स्थानिक नसल्याने जिल्ह्याचा विकास गेल्या काही वर्षांपासून ठप्प असल्याची भावना सोलापूरकरांमध्ये आहे.
यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारातही सोलापूर जिल्ह्यातून कोणालाही कॅबिनेट किंवा राज्य मंत्रिपद मिळाले नाही. जिल्ह्याच्या अनास्थेवर आता सोलापूरकरांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
सोलापूर जिल्हा हा ऐतिहासिक, औद्योगिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा असूनही जिल्ह्याला आवश्यक असे राजकीय प्रतिनिधीत्व मिळत नसल्याची खंत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
लोकांना आशा होती की, यंदा पालकमंत्री सोलापूर जिल्ह्यातून असेल. मात्र पुन्हा एकदा जिल्ह्याला उपेक्षित ठेवण्यात आल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
पालकमंत्री बाहेरचा असल्यामुळे सोलापूरच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. अपूर्ण प्रकल्प, उद्योग विकासाची कमतरता आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे जिल्ह्याच्या प्रगतीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे, असे मत जिल्ह्यातील विकास कार्यात पुढाकार घेणाऱ्या अनेक संघटनांनी सोलापूर विकास मंचकडे व्यक्त केले आहे.
सोलापूरकरांनी आता या परिस्थितीवर तीव्र नाराजी दर्शवत सध्याच्या सरकारवर टीकाही केली असून, जिल्ह्याच्या विकासासाठी स्थानिक नेतृत्वाची मागणी केली आहे. जिल्ह्याला त्यांच्या हक्काचा व आवाज उचलणारा प्रतिनिधी मिळाला नाही, तर पुढील निवडणुकीत याचा फटका सरकारला बसेल, असा इशाराही अनेक नागरिकांनी दिला आहे.
सोलापूरच्या विकासासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आता जिल्हाभर जोर धरत असल्याची माहिती सोलापूर विकास मंचचे सदस्य मिलिंद भोसले, योगिन गुर्जर, केतन शहा, विजय जाधव, अॅड. दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षीरसागर यांनी दिली.(स्रोत:पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज